रात्री उशीरापर्यंत एकत्र होते शाहिद आणि सोनाक्षी!

अभिनेता शाहिद कपूर आणि सोनाक्षी सिन्हाला शनिवारी रात्री वांद्र्यातील एका रेस्टॉरेंटमध्ये एकत्र डिनर करतांना पाहिलं गेलं.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: May 13, 2014, 12:52 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अभिनेता शाहिद कपूर आणि सोनाक्षी सिन्हाला शनिवारी रात्री वांद्र्यातील एका रेस्टॉरेंटमध्ये एकत्र डिनर करतांना पाहिलं गेलं.
मुंबईतल्या एका टॅब्लॉईडनुसार जेव्हा शाहिद आणि सोनाक्षी रात्री 11 वाजता जेवत होते. तेव्हा त्यांच्यासोबत दोन मित्रही होते. जेवण झाल्यानंतर शाहिद आपल्या जुहूतील नव्या घरात गेला. शाहिद आणि सोनाक्षी दोघंही रेस्टॉरेंटमधून वेगवेगळे निघाले मात्र जवळपास पावणे बाराच्या सुमारास ते सगळे शाहिदच्या घरी पोहोचले. त्यात सोनाक्षीही होती.
शाहिदच्या बिल्डिंगखाली काही फोटोग्राफर त्यांची वाट पाहत होते. मात्र शाहिदनं त्यांना तिथून जायला सांगितलं. मिळालेल्या माहितीनुसार नुकतंच सोनाक्षीनं ज्या एजंसीसोबत करार केलाय तिच कंपनी शाहिदचं काम पाहते. शाहिदच्याच सल्ल्यानं सोनाक्षीनं हे पाऊल उचललं असं बोललं जातंय.
सध्या तरी शाहिद आणि सोनाक्षी कोणत्याही प्रकारच्या रोमांसबाबत नकार देतायेत, पण इतक्या रात्री उशीरा एकत्र डिनर केल्यानंतर त्याच्या घरीही सोनाक्षी गेली आणि हे म्हणतात आमच्यात तसं काही नाही...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.