`अध्ययन`साठी शेखर सुमनचं घर-दार गहाण...

आपल्या मुलाची बॉलिवूडमध्ये धडाक्यात लॉन्चिंग करण्यासाठी शेखर सुमन सज्ज झालाय. `अध्ययन`साठी त्यानं आपलं सर्वस्व पणाला लावलंय.

Updated: Feb 5, 2014, 04:30 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आपल्या मुलाची बॉलिवूडमध्ये धडाक्यात लॉन्चिंग करण्यासाठी शेखर सुमन सज्ज झालाय. `अध्ययन`साठी त्यानं आपलं सर्वस्व पणाला लावलंय.
शेखर सुमन आपल्या मुलाला लॉन्च करतोय. अध्ययन सुमन हा शेखर सुमनचा मुलगा... अध्ययन लवकरच `हार्टलेस` या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. `स्टँण्ड अप कॉमेडी`नं हसवणाऱ्या शेखर सुमननं `हार्टलेस` या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. `हार्टलेस` हा हॉलिवूडच्या `अवेक` या चित्रपटाचा रिमेक आहे. यानिमित्तानं शेखर पहिल्यांदाच गंभीर कलाकृती सादर करतोय.
अध्ययनच्या लॉन्चिंगसाठी शेखरनं आपलं घरदार पणाला लावलंय. केवळ `अवेक`चे अधिकार विकत घेण्यासाठी चित्रपटच्या अधिकारांसाठी शेखरला पाच कोटी मोजावे लागलेत. पण आपल्या लाडक्या लेकासाठी शेखरने हसत ही किंमत मोजली. या रकमेची जुळवाजुळव करण्यासाठी शेखर सुमनला आपलं राहतं घरही गहाण ठेवावं लागलंय. पाच कोटी ही रक्कम आपल्यासाठी मोठी असल्याचं शेखर मान्य करतो. रिमेक बनवताना मूळ कथेचा आशय बदलावा लागू नये, त्यामुळे आपण चित्रपटाचे अधिकार खरेदी केल्याचं शेखर सुमन सांगतोय. चित्रपटाला भारतीय टच देताना आपण आपल्या मनाप्रमाणे कथानकात बदल केले आहेत, असं शेखर सुमननं म्हटलंय.
७ फेब्रुवारीला `हार्टलेस` रिलीज होणार आहे. `हार्टलेस हा माझा ड्रिम प्रोजेक्ट आहे... माझ्या एकुलत्या एक लेकासाठी आपण सर्वस्व पणाला लावल्याचे` शेखरचं म्हणण आहे. आपल्या पित्याच्या या शब्दांनी अध्ययनदेखील भारावलेला दिसला. आता आपल्या पित्यासाठी स्वत:ला सिद्ध करून दाखवायचं धनुष्य अध्ययनला पेलावं लागणार, असं दिसतंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.