जिस्म-२ नंतर आता रागिनी MMS मध्ये सनी लिऑन

जिस्म-२ या पूजा भट्टच्या चित्रपटाने आपल्या बॉलिवुडमधील इनिंगला सुरूवात करणाऱी हॉट अभिनेत्री सनी लिऑन आता आपला आगामी चित्रपट रागिनी एमएमएस २ बाबत फारच उत्साहीत आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Dec 17, 2012, 04:35 PM IST

www.24taas.com, मुंबई
जिस्म-२ या पूजा भट्टच्या चित्रपटाने आपल्या बॉलिवुडमधील इनिंगला सुरूवात करणाऱी हॉट अभिनेत्री सनी लिऑन आता आपला आगामी चित्रपट रागिनी एमएमएस २ बाबत फारच उत्साहीत आहे.

भारतीय मूळाची कॅनेडीयन अभिनेत्री असलेली सनी लिऑन आता एकता कपूरच्या रागिनी एमएमएसच्या सिक्वलमध्ये काम करती आहे. यात सनी पुन्हा आपल्या हॉट अदा दाखविण्यासाठी सरसावली आहे. रागिनी एमएमएस हा एक हॉरर चित्रपट आहे.
रागिनी एमएमएसची तयारी सुरू झाली आहे. याबाबत मी खूप उत्साहित आहे, असे सनी लिऑनने ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग साइटवर ट्विट केले आहे. मी भारतात आणखी एका चित्रपटात काम करीत आहे आणि एका मोठ्या कंपनीसोबत काम करते याचा मला विश्वास बसत नाही. विशेष म्हणजे सनी लिऑनने आता पॉर्न चित्रपटाकडून बॉलिवुडकडे आपला मोर्चा वळवला आहे.