सेक्स कॉमेडीत लैला लेले बनणार सनी लिऑन

सनी लिऑनचा मागील चित्रपट ‘रागिनी एमएमएस २’ सुपरहीट झाल्यानंतर सनी लिऑन आता काही नवीन रोल करण्याच्या तयारीत आहे. पण मिळेलल्या माहितीनुसार सनी लिऑनचा आगामी चित्रपट एक सेक्स कॉमेडी असणार आहे. त्याचे शीर्षक असणार आहे ‘मस्तीजादे’... चित्रपटात सनी लिऑनचे नाव असणार आहे लैला लेले.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Apr 30, 2014, 05:17 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सनी लिऑनचा मागील चित्रपट ‘रागिनी एमएमएस २’ सुपरहीट झाल्यानंतर सनी लिऑन आता काही नवीन रोल करण्याच्या तयारीत आहे. पण मिळेलल्या माहितीनुसार सनी लिऑनचा आगामी चित्रपट एक सेक्स कॉमेडी असणार आहे. त्याचे शीर्षक असणार आहे ‘मस्तीजादे’... चित्रपटात सनी लिऑनचे नाव असणार आहे लैला लेले.
शूट आऊट एट वडाळा मध्ये सनी लिऑन हिने लैला तेरी लुट लैगी हा आयटम नंबर केला होता, त्यावरूनच मस्तीजादे या चित्रपटात तिचे नाव लैला लेले असणार आहे. या चित्रपटाची निर्मिती प्रितीश नंदी कम्युनिकेशन करणार आहे.
या प्रॉडक्शन हाऊसने यापूर्वी शादी के साइड इफेक्ट्स हा चित्रपट बनवला होता. पण त्याने अपेक्षित कामगिरी केली नाही. मस्तीजादेचे दिग्दर्शन मिलाप जावेरी करणार आहेत. मिलाप हे आतापर्यंत डायलॉग रायटर म्हणून ओळखले जात होते. त्यांनी मैं तेरा हिरो, ग्रँड मस्ती आणि शूट आउट एट वडाळा यांचे स्क्रिन प्ले आणि डायलॉग लिहिले होते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.