सुष्मिताला मदर तेरेसा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान

बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी मिस यूनिव्हर्स सुष्मिता सेन हिला प्रतिष्ठीत अशा मदर तेरेसा सामाजिक न्याय आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 28, 2013, 08:11 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी मिस यूनिव्हर्स सुष्मिता सेन हिला प्रतिष्ठीत अशा मदर तेरेसा सामाजिक न्याय आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आलाय.
दोन मुलींना दत्तक घेणाऱ्या ३७ वर्षीय मॉडेल-अभिनेत्री सुष्मितानं हा पुरस्कार मिळाल्यानंतर ही बातमी ट्विटरवरून दिलीय.
सुष्मितानं आपल्या ट्विटर अकाऊंटवर लिहिलंय, मला काल रात्री मदर तेरसा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला. बहुमूल्य! मदर तेरेसा यांच्या नावाचा हा पुरस्कार मिळणं हा माझ्यासाठी खूप आल्हाददायक अनुभव होता.

यापूर्वी दलाईलामा आणि मलाला युसूफजई यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. वर्ष १९९४ मध्ये मिस युनिव्हर्सचा किताब जिंकताना सुष्मितान मदर तेरेसा यांच्या कामाची प्रशंसा केली होती. यामुळे सुष्मिताची अनेकांनी प्रशंसा केली होती.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.