ऊर्मिलाला करायचंय ‘कमबॅक’

८० आणि ९० च्या दशकांत बॉलिवूडमध्ये अनेक चेहरे असे होते की प्रेक्षकांना त्या कलाकरांना पाहताना खूप आनंद व्हायचा. अशाच चेहऱ्यांमध्ये एक बबली गर्ल होती ती म्हणजे ऊर्मिला मातोंडकर...

Updated: Oct 9, 2012, 06:09 PM IST

www.24taas.com, मुंबई
८० आणि ९० च्या दशकांत बॉलिवूडमध्ये अनेक चेहरे असे होते की प्रेक्षकांना त्या कलाकरांना पाहताना खूप आनंद व्हायचा. अशाच चेहऱ्यांमध्ये एक बबली गर्ल होती ती म्हणजे ऊर्मिला मातोंडकर... गेल्या काही वर्षांपासून हा चेहरा प्रेक्षकांना पडद्यावर पाहायला मिळालेला नाही. पण, ऊर्मिला मात्र आता स्वत:च चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना भेटायला आतूर झालीय.

ऊर्मिलाला आपण कधी एकदा पुन्हा मोठ्या पडद्यावर परत येतोय, असं झालंय. पण ती वाट बघतेय ती चांगल्या स्क्रीप्टची... ती म्हणते, ‘मी चांगल्या पटकथेची वाट बघतेय आणि माझ्या करिअरने ज्या प्रकारचं वळण घेतलंय त्याबाबत मी खूश आहे. मला कसल्याही प्रकारचा पश्चाताप होत नाहीय.’

‘छम्मा छम्मा गर्ल’ ऊर्मिला मातोंडकरचा बॉलिवूडमधील सफर तसा चांगलाच राहिला. १९९५ साली ‘रंगीला’मधून आपल्या अभिनयाचं जोरदार प्रदर्शन करून सिनेचाहत्यांना तिने भूरळ घातली. आता भलेही उर्मिलाचे वय झाले असले तरिही तरूण वयात बॉलिवूडमध्ये तिची अदाकारी कमालीची होती.

९० व्या दशकात ऊर्मिलाच्या रंगीला, जुदाई, सत्या या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर एकच धमाल उडवून दिली होती. २००७ आलेला ‘कर्ज’ हा तिचा शेवटचा चित्रपट होता. यावर्षी तिने हृदयनाथ या मराठी सिनेमात आयटम साँग केलं होतं. ऊर्मिला आता अशा पटकथेच्या शोधात आहे, ज्यामध्ये तिला पहिल्यापेक्षा वेगळ्या आणि नविन भूमिका करायला मिळतील.