विनय आपटे यांना प्रतिक्रियातून श्रद्धांजली द्या!

ज्येष्ठ अभिनेते विनय आपटे यांचे अंधेरी येथील कोकिळाबेन अंबानी रुग्णालयात निधन झाले. विनय आपटे यांनी १९७४ पासून अभिनयाला सुरुवात केली. त्यांना आपल्या श्रद्धांजलीपर प्रतिक्रिया द्या.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 7, 2013, 11:02 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
ज्येष्ठ अभिनेते विनय आपटे यांचे अंधेरी येथील कोकिळाबेन अंबानी रुग्णालयात निधन झाले. विनय आपटे यांनी १९७४ पासून अभिनयाला सुरुवात केली. त्यांना आपल्या श्रद्धांजलीपर प्रतिक्रिया द्या.
विनय आपटे हे एक अभिनेता म्हणून नव्हे तर दिग्दर्शक होते. त्यांनी निर्मित्याची भूमिका बजावली आहे. अभिनयात विनय आपटे यांनी आपला ठसा उमटवला होता.
प्रतिक्रिया देण्यासाठी खालील बॉक्समध्ये टाईप करा.
विजय तेंडुलकरांनी लिहलेल्या मित्राची गोष्ट यासह असंख्य नाटकांचे त्यांनी दिग्दर्शन केले होते. झी मराठीच्या एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेत अफलातून भूमिका साकारली होती. मुक्ता बर्वे हिच्या वडिलांची भूमिका केली होती. ही भूमिका घराघरात पोहोचली होती.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.