www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
आमीर खानचा ‘धूम ३’च्या तिकीटाची किंमत ऐकली तर तुम्हाला निश्चितच धक्का बसू शकतो... कारण, ‘धूम – ३’ सिनेमा पाहायचा असेल तर तुम्हाला एका तिकीटासाठी तब्बल ९०० रुपये मोजावे लागणार आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या शुक्रवारी म्हणजेच २० डिसेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या धूम-३ च्या एका तिकिटाची किंमत आयमॅक्स थिएटरमध्ये सकाळच्या शो साठी ४०० ते ६०० रुपये आणि संध्याकाळच्या शोसाठी ७०० ते ९०० रुपयांपर्यंत किंमत ठरवली गेलीय.
म्हणजेच एकाच कुटुंबातील पाच जण जर हा सिनेमा पाहायला जात असतील तर जवळजवळ ४,५०० रुपये खर्च होऊ शकतात. परंतु, इतर मल्टिप्लेक्स थिएटर्समध्ये याच तिकिटांची किंमत ३०० ते ४०० रुपयांपर्यंत आहे. परंतु, इतर सिनेमांपेक्षा या सिनेमाच्या तिकिटांची किंमत जास्त असेल, हे मात्र नक्की!
दिल्लीमध्ये या तिकीटांची किंमत मुंबईपेक्षा थोडी कमी असण्याची शक्यता आहे. दिल्लीत तिकिटांची किंमत मल्टिप्लेक्स थिएटर्समध्ये २०० ते २५० रुपयांपर्यंत आहे. काही ठिकाणी हीच किंमत ५०० रुपयांपर्यंत असू शकते. तर, चंदीगड आणि जयपूरसारख्या छोट्या शहरांमध्ये धूम – ३ च्या तिकिटांची किंमत १५० ते ४०० रुपयांपर्यंत असू शकते.
धूम-३ भारतात जवळजवळ चार हजार स्क्रीनवर प्रदर्शित होणार आहे. तर विदेशांमध्ये ७००-७५० पेक्षा जास्त स्क्रीनवर रिलीज होण्याची शक्यता आहे. म्हणजेच, हा सिनेमा जवळजवळ ४८०० स्क्रिन्सवर प्रदर्शित होणार आहे. तिकीटांच्या विक्रीची शक्यता लक्षात घेतली तर धूम ३ च्या पहिल्याच दिवशी जवळजवळ ८० टक्क्यांपेक्षा जास्त सीट फूल असतील. म्हणजेच, ढोबळ मानानं या सिनेमाची एकाच स्क्रिनसाठी कलेक्शन पाच लाख असेल.... म्हणजेच, पहिल्याच दिवशी जवळजवळ २४० करोड रुपयांचं कलेक्शन... त्याशिवाय या सिनेमाचे टीव्ही अधिकार अगोदरच सोनी टीव्हीला ७५ करोड रुपयांमध्ये विकले गेले आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.