करीना : जगातील सर्वात ‘हॉट’ बाला

‘हिरोईन’ची हिरोईन म्हणजेच करीना कपूर आता ठरलीय भारतातली सगळ्यात ‘हॉट गर्ल’... मैक्सिम मॅगझिननं करिनाला भारतातीलच नव्हे तर जगातील सगळ्यात जास्त ‘हॉट आणि सेक्सी’ बाला म्हटलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 6, 2012, 05:29 PM IST

www.24taas.com, मुंबई
‘हिरोईन’ची हिरोईन म्हणजेच करीना कपूर आता ठरलीय भारतातली सगळ्यात ‘हॉट गर्ल’... मैक्सिम मॅगझिननं करिनाला भारतातीलच नव्हे तर जगातील सगळ्यात जास्त ‘हॉट आणि सेक्सी’ बाला म्हटलंय.
‘हलकट जवानी’ म्हणत अनेकांचे होश उडवणारी करीना आता दिसणार आहे ती मॅक्झिमच्या सप्टेंबर अंकाच्या कव्हर पेजवर... तीही आपल्या ‘हॉट अॅन्ड स्पायसी’ लूकमध्ये... मॅक्झिमनं यासाठी एक सर्व्हे केला होता. यासर्व्हेवरून हाती आलेल्या माहितीनुसार त्यांनी करिनाचा ‘जगातील सर्वात हॉट बाला’ असा उल्लेख केलाय.
याबद्दलच करीनाला विचारलं असता तिनं म्हटलंय की, ‘सेक्सी आणि हॉट दिसणं ही चांगलीच गोष्ट आहे आणि मॅक्झिमसारख्या मॅगझिननं कुणाला हॉट आणि सेक्सी म्हणणं म्हणजे सोन्याहून पिवळं... मला असं वाटतं की महिलांसाठी हॉटनेस म्हणजेच त्यांना कसं दिसायचंय हे त्यांना माहित असतं आणि म्हणूनच मी या विशेषणांना माझं कौतूकचं समजते.’
करीना आपल्या फिटनेसबाबतीत किती जागरुक असते हे सगळ्यांनाच माहित आहे. बॉलिवूडमध्ये आपल्या फिटनेससाठी मेहनत घेणाऱ्यांपैकी तीचा क्रमांक नेहमीच वर असतो. एव्हढचं नाही आपल्या सौंदर्यामागची गुपितं उघड करणारं एक पुस्तकही करीना डिसेंबरमध्ये घेऊन येतेय. ‘स्टाइल डायरी ऑफ ए बॉलीवूड डिवा’ नावाच्या या पुस्तकात करीना आपल्या चाहत्यांबरोबर आपल्या बऱ्याच सिक्रेट गोष्टी शेअर करणार आहे.