पाकिस्तानच्या सेंसॉर बोर्डाने पुन्हा भारतीय सिनेमांबद्दल कडक धोरण स्वीकारलं आहे. सैफ अली खान आणि सलमान खाननंतर आता पाकिस्तानच्या लाडक्या शाहरुख खानलाही सेंसॉर बोर्डाने झटका दिला आहे.
www.24taas.com, मुंबई
सैफचा ‘एजंट विनोद’ आणि सलमानचा ‘एक था टायगर’ला पाकिस्तानी सेंसॉर बोर्डाने पाकिस्तानात बंदी घातली होती. यावेळी शाहरुख खानचा ‘जब तक है जान’देखील पाकिस्तानात रिलीज होणं अशक्य झालं आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानात `जब तक है जान` सिनेमावर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. “या सिनेमात शाहरुख खान काश्मिर खोऱ्यात लढणारा भारतीय सैनिक दाखवण्यात आला आहे. त्यामुळे पाकिस्तानने या सिनेमाच्या जाहिरातीलादेखील पाकिस्तानी टीव्हीवर बंदी घातली आहे. त्यामुळे हा सिनेमादेखील पाकिस्तानात दाखवण्याची शक्यता कमी आहे.” असं सूत्रांकडून सांगण्यात आलंय.