www.24taas.com,मुंबई
टीम इंडियाचा इंग्लंडने धुव्वा उडवला आणि कसोटी मालिकेत १-१ची बरोबरी साधली. माँटी पानेसरने अर्धा संघ तंबूत पाठविला. त्यामुळे मुंबई टेस्टमध्ये इंग्लंडने दहा गडी राखून सहज विजय मिळवला.
वानखडेवर टीम इंडियाचे अक्षरश: इंग्लंडने मायदेशात वस्त्रहरण केले. मुंबईत वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या दुस-या कसोटीत टीम इंडिया दुसरा डाव अवघ्या १४२ रन्सवर आटोपला. इंग्लंडला विजयासाठी केवळी ५७ रन्सची आवश्यकता होती.
इंग्लंडने एकही गडी न गमावता केवळ ९.४ ओव्हरमध्ये ५८ रन्स करत सामन्यात विजय मिळवला. इंग्लंडचा कॅप्टन अॅलिस्टर कूक (१८) आणि कॉम्प्टन (३०) नाबाद खेळी करत इंग्लंडला विजय मिळवून दिला. १८६ रन्सची खेळी करणा-या केविन पीटरसनला मॅन ऑफ द मॅच म्हणून घोषित करण्यात आले.
पहिल्या डावाप्रमाणेच दुस-या डावातही इंग्लंडच्या माँटी पनेसरने टीम इंडियाच्या बॅटींगला खिंडार पाडले. माँटीने अवघ्या ८१ धावांमध्ये ६ गडी तंबूत पाठविले.
केवळ गौतम गंभीरने ६५ रन्सची खेळी मात्र, टीम इंडियाचे अन्य कोणतेही फलंदाज मोठी खेळी न करू शकल्याने टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध फक्त ५६ रन्सची आघाडी घेतली. त्यामुळे टीम इंडियाचा पराभव निश्चित होता. इंग्लंडने एकही गडी न गवमता ५७ रन्स केल्या.
पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडिया ३२७ रन्सवर ऑलआऊट झाली. तर टीम इंडियाचा दुसरा डाव केवळ १४२ रन्समध्ये आटोपला. पहिल्या डावात इंग्लिश बॅट्समन्सच्या धडाक्यामुळे भारतीय बॉलर्सना घाम फुटला होता. भारतीय फिरकिने ४१३ वर इंग्लिश टीमला ऑलआऊट केली.