www.24taas.com, मुंबई
जगभरातील क्रिकेट खेळाडूंच्या साथीने आयपीएलने आपलं चागलंच बस्तान बसवलं होतं. मात्र आता आयपीएलला चांगलाच धक्का बसला आहे. आयपीएल मुख्य प्रायोजक डीएलएफने पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर आयपीएलची साथ सोडली आहे.
आयपीएलसोबत प्रायोजकत्वासाठी असलेला करार यापुढे कायम न ठेवण्याचा निर्णय डीएलएफने घेतला आहे. आयपीएलला सोडून आता इतर खेळांना मदत करण्याचे या कंपनीने ठरवले आहे.
गेल्या पाच वर्षांपासून आम्ही एका उद्देशाने प्रायोजकत्व स्वीकारले होते. आम्हाला आमचा ब्रँड भारताबाहेरही पोचवायचा होता, आणि आम्ही त्यात यशस्वी झालो. असे डीएलएफ समूहाचे व्यवस्थापकीय संचालक राजीव तलवार यांनी सांगितले.
मुख्य प्रायोजकत्व बनण्यासाठी डीएलएफने आयपीएलला ५० मिलियन डॉलर दिले होते. करार नुतनीकरण्याची शेवटची मुदत २८ जुलै होती.