ऑलराऊंडर युवराज क्रिकेटचा चॅम्पियन - धोनी

धोनी म्हणतो, ‘युवराज चॅम्पियन आहे आणि त्याचं कमबॅक बघून मला खूप आनंद झालाय’.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 12, 2012, 06:51 PM IST

www.24taas.com, कोलंबो
टी २० वर्ल्डकपसाठी भारतीय क्रिकेट टीम श्रीलंकेत दाखल झालीय. यावेळी कॅप्टन धोनीनं भारतीय टीमचा परफॉर्मन्सवर चांगला राहिलाय आणि टी २० वर्ल्डकपमध्ये ही टीम जोरदार खेळ करून दाखवेल, अशी आशा व्यक्त केलीय. यावेळी धोनीनं युवराज सिंहचंही कौतुक केलंय.

नुकताच कॅन्सरमधून परतलेला युवराज सिंह या वर्ल्डकपमध्ये खेळण्यासाठी उत्सुक आहे. तसंच त्यानं मंगळवारी झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात आपल्यातील जोश कायम असल्याचं सगळ्या जगाला दाखवून दिलंय. यामुळेच भारतीय क्रिकेट टीमही खूप खूश आहे. यावर धोनी म्हणतो, ‘युवराज चॅम्पियन आहे आणि त्याचं कमबॅक बघून मला खूप आनंद झालाय’. यासोबतच युवराजची बॅटींग ट्वेटी २० वर्ल्डकप मॅचमध्ये खूप महत्त्वाची भूमिका पार पाडेल, किंबहुना तो या मॅचेसमध्ये ऑलराऊंडरची भूमिकाही निभावू शकेल, असा विश्वासही धोनीला वाटतोय. युवराजच्या कमबॅकमुळे बाकी टीम आणि करोडो फॅन्सला जेवढा आनंद झालाय तेवढाच आनंद धोनीलाही झालाय. भारतीय टीममध्ये रोहित, विराट, रैना, युवी आणि सेहवागसारख्या खेळाडूंचा समावेश असल्यानं धोनीचा आत्मविश्वासही वाढलाय.
भारतीय क्रिकेट टीम वर्ल्डकप मॅचसाठी आज श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये दाखल झालीय. यावेळी सगळे खेळाडू नारंगी रंगाच्या टीशर्ट मध्ये एअरपोर्टवर दाखल झाले. भारत ट्वेंटी २० टूर्नामेंटमध्ये पहिली मॅच अफगानिस्तानविरुद्ध १९ सप्टेंबर रोजी खेळणार आहे.