www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
मास्टर ब्लास्टर सचिननं आपल्या निवृत्तीच्या बातम्यांवर पुन्हा एकदा विराम लावलाय. ‘मला नाही वाटत याबाबत मला काही विचार करण्याची गरज आहे’ याशब्दात सचिन तेंडुलकरनं झी न्यूजचे संपादक सुधीर चौधरी यांनी घेतलेल्या खास मुलाखतीत हे स्पष्ट केलं. संपूर्ण देश जाणून घेऊ इच्छितो की, सचिन कधी निवृत्ती घेणार हा प्रश्न विचारला असता सचिननं असं कोण बोलतंय हा प्रश्न उपस्थित केला. सचिन आपल्या होमपीचवर २००वी टेस्ट मॅच खेळून निवृत्ती घेणार असल्याची सध्या चर्चा आहे.
निवृत्तीबाबत होणारी चर्चा आणि त्याच्या आतापर्यंतच्या क्रिकेट वाटचालीबाबातच्या प्रश्नांना सचिननं प्रामाणिकपणे उत्तरं दिली. संपूर्ण देश सचिनला क्रिकेटचा देव मानतो. याबाबत विचारलं असता सचिननं हसूनचं उत्तर दिलं की, “मी देव नाही, मी फक्त क्रिकेट खेळतो, आतापर्यंत जे काही माझ्या आयुष्यात घडलं तो देवाचा आशीर्वादच आहे”.
सचिन पुढं म्हणाला, “आपण सगळे चुका करतो, जर मी ही चुका नसत्या केल्या तर कधीच आऊट झालो नसतो”.यावर मॅच खेळण्याअगोदर काय तयारी करतो असं विचारलं असता “मॅचच्या आधी मी थोडी तयारी करतो, सामान्यपणे आपल्या आयुष्यात प्रत्येक वेळी मानसिक तयारी करणं गरजेचंच असतं”, असंही सचिन म्हणाला.
सध्या अनेक क्रिकेटपटू वादाच्या भोवऱ्यात अडकले असतांना सचिन कधीही कोणत्या वादात अडकला नाही, याबाबत सचिनला प्रश्न विचारला तेव्हा “शालेय जिवनापासूनच जेव्हा मी काही यश गाठायचो, तेव्हा माझ्या घरात त्याचा आनंद सामान्यपणेच साजरा केला जायचा. देवाचा प्रसाद वाटला जायचा. माझा मोठा भाऊ नेहमी म्हणायाचा, तू फक्त मॅच खेळ, मॅचबाबत लोकांना बोलू दे”.
सचिनची स्वप्नातली कार कोणती हे विचारलं तेव्हा लहानपणी माझी ड्रीम कार म्हणजे ‘मारुती-८००’ होती, असं सचिन म्हणाला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
पाहा व्हिडिओ