धोनीला जे जमलं नाही ते `महिलांनी करून दाखवलं`

भारतीय क्रिकेट टीमच्या पुरूषांना जे जमू शकलं नाही ते महिला टीमने करून दाखवलं. धोनीच्‍या टीम इंडियाला टी-20 विश्‍चचषक स्‍पर्धेची उपांत्‍य फेरी गाठण्‍यात अपयश आले होते.

Updated: Oct 31, 2012, 06:11 PM IST

www.24taas.com, ग्वांगझू
भारतीय क्रिकेट टीमच्या पुरूषांना जे जमू शकलं नाही ते महिला टीमने करून दाखवलं. धोनीच्‍या टीम इंडियाला टी-20 विश्‍चचषक स्‍पर्धेची उपांत्‍य फेरी गाठण्‍यात अपयश आले होते.
परंतु, भारतीय परंतु, महिला संघाने आशिया चषक टी-20 स्‍पर्धेत पाकिस्‍तानला पराभूत करुन विजेतेपद पटकावले. भारतीय संघ या स्‍पर्धेत एकदाही पराभूत झाला नाही. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु, फलंदाज अपयशी ठरले.
महिला संघ 81 धावांमध्‍येच गारद झाला. परंतु, गोलंदाजांनी खरी कमाल केली. पाकिस्‍तानचा डाव 63 धावांमध्‍येच गुंडाळून भारताने 18 धावांनी विजय मिळविला आणि जतेपदावर नाव कोरले.