भारत पराभवाच्या छायेत

भारत पराभवाच्या छायेत आहे. शेवटच्या जोडीने किल्ला लढवत डावाने होणारा पराभव टाळल आहे. आर अश्विनने अर्धशतक झळकाविले. भारताच्या नऊ बाद

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 8, 2012, 04:19 PM IST

www.24taas.com,कोलकाता
भारत पराभवाच्या छायेत आहे. शेवटच्या जोडीने किल्ला लढवत डावाने होणारा पराभव टाळल आहे. आर अश्विनने अर्धशतक झळकाविले. भारताच्या नऊ बाद २३९ धावा झाल्या आहेत. ३२ रन्सने भारताने इंग्लंडवर आघाडी घेतली आहे.
भारताचा दुसरा डाव गडगडला. सेहवाग बाद झाल्यानंतर एकामागून एक खेळाडू बाद झालेत. आज सचिन, गंभीर ,पुजारा, युवराज सिंग आणि विराट कोहली यांच्या कामगिरीकडे सगळ्यांचे लक्ष होते. मात्र, सचिन, विराट कोहली, युवी यांना चांगली खेळी करता आली नाही. भारतीय फलंदाजीच्या मधल्या फळीने इंग्लंडच्या गोलंदाजांसामोर लोटांगण घातले.
आर अश्विन ८२ तर प्रग्यान ओझा ३ रन्सवर खेळत आहेत. सचिन तेंडुलकर झेल ५, विराट कोहली २०, चेतेश्वर पुजारा ८ युवराज सिंग ११, महेंद्रसिंग धोनी ०, झहीर खान ० ईशांत शर्मा १० यांनी निराशा केली. गौतम गंभीर ४० तर सेहवागने ४९ धावा केल्या.