www.24taas.com, नागपूर
कूकच्या इंग्लड आर्मीने नागपूर कसोटीच्या अंतीम दिवशी संथ फलंदाजी करत सामना अनिर्णीत ठेवला आणि भारताला तब्बल २८ वर्षांनी लाजीरवाणा मालिका पराभव स्वीकारावा लागला. इंग्लंभडने दर्जेदार खेळ करुन मायदेशातही टीम इंडियाचे पानीपत केले.
जॉनथन ट्रॉटनंतर इयन बेलनेही दमदार शतक ठोकले. इयन बेने 293 चेंडुंमध्ये 1 षटकार आणि 13 चौकारांसह शतक पूर्ण केले. खेळ संपला त्यावेळी बेल 116 तर जो रुट 20 धावांवर नाबाद होते.
इंग्लंडने 4 बाद 352 धावांवर डाव घोषित केला.
भारताला मालिकेत बरोबरी साधण्यासाठी नागपूर कसोटी जिंकणे आवश्यक होते. परंतु, फलंदाज आणि गोलंदाजांनी सपशेल निराशा केली. खेळपट्टीकडूनही साथ मिळाली नाही. परंतु, इंग्लंडच्या खेळाडुंनी सर्वच क्षेत्रात भारतीय खेळाडूंवर मात केली. मोक्याच्या क्षणी कर्णधार कुकने मोठ्या खेळी करुन संघाला आघाडी मिळवून दिली. तर इंग्लंडचे फिरकी गोलंदाज स्वान आणि मॉन्टी पानेसर भारतीय फिरकीपटूंपेक्षा सरस ठरले. महेंद्रसिंग धोनीला स्वतः जिगरबाज कामगिरी करुन संघाचे मनोबल उंचावण्या्त अपयश आले. दिग्गज फलंदाजही सपशेल अपयशी ठरले. त्यामुळे इंग्लंडच संघ खरा विजेता ठरला.
सुरूवातीला पाचव्या दिवशीही भारतीय गोलंदाजाना विकेट काढण्यात अपयश आले. त्यामुळे कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा डाव फसला आहे. धोनीने धाडसी निर्णय घेत पहिला डाव घोषिक केला होता. मात्र, इंग्लंडच्या फलंदाजानी चांगला फलंदाजी केली. जॉनथन ट्रॉट आणि इयन बेल यांनी शतकी भागीदारीमुळे सामन्याचा निकाल लागण्याची शक्यता कमी झाली.
इंग्लंडच्या संथ फलंदाजीने नागपूर कसोटीचा चौथा दिवस गाजवला. तर जॉनथन ट्रॉट आणि इयन बेल यांनी शतकी भागीदारी करुन भारताची विजयाची आशा संपुष्टाबत आणलीय. त्यारमुळे भारताला लाजीरवाण्याय मालिका पराभवाला सामोरे जावे लागणार, हे स्प ष्टा झाले आहे.
भारताने पहिला डाव ९ बाद ३२६ धावांवर घोषित केल्यानंतर दिवसअखेर इंग्लंडने ३ बाद १६१ धावा काढल्या. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी इंग्लंडचा जोनाथन ट्रॉट ६६ आणि इयान बेल २४ धावांवर खेळत होते. आजच्या पाचव्या दिवशी तीन बाद २३५ धावा केल्यात. जोनाथन ट्रॉटने शानदार शतक झळकावले. (१०४नाबाद) तर बेलने अर्धशतक मारताना ५८ धावा केल्या आहेत. ही जोडी मैदानात टिकून आहे.
ऍलिस्टर कूक १३, निक कॉम्पटन ३४आणि केविन पीटरसन ६ रन्सवर आऊट झाले. टीम इंडियाकडून प्रग्यान ओझा, आर. अश्विन आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी एक-एक विकेट घेतल्या. या सीरिजमध्ये २-१ने पिछाडीवर असलेल्या इंडियासमोर नागपूर टेस्ट वाचवून सीरिज ड्रॉ करण्याचं आव्हान असणार आहे.