www.24taas.com, वृत्तसंस्था, कोलकत्ता
भारताच्या रोहित शर्माने पदार्पणातच वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावत चांगली भागिदारी केली. टीम इंडियाने दुसऱ्या दिवसअखेर ६ बाद ३५४ धावा करत, वेस्ट इंडिजवर १२० धावांची आघाडी घेतली. रोहितला चांगली साथ देत आर. आश्विनने नाबाद ९२ धावा केल्या आहेत. तोही आता शतकापासून ८ पावले दूर आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत दुसऱ्या दिवसाची सुरुवात भारताची निराशाजनक झाली. २३४ धावांचा पाठलाग करत १९७ धावांनी पिछाडीवर असलेल्या भारताची अवस्था लंचपूर्वी ५ बाद ८७ अशी झाली होती. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह (१०धावा), शिखर धवन (२३धावा) आणि मुरली विजय (२६ धावा), चेतेश्वर पुजारा (१७ धावा) आणि विराट कोहली (३ धावा) हे पाचही आघाडीचे फलंदाज झटपट बाद झालेत. दरम्यान, सचिनला खोटा आऊट देल्याने क्रीडाप्रेमी नाराज झालेत.
कर्णधार महेंद्रसिंग धोनीने रोहित शर्माच्या साथीने भारताचा डाव सावरला. धोनीने ४२ धावांची खेळी करत रोहितसह सहाव्या विकेटसाठी अर्धशतकी भागिदारी केली. पण, टिनो बेस्टच्या गोलंदाजीवर तो यष्टीरक्षक रामदिनकडे झेल देवून बाद झाला. त्यानंतर आलेल्या आश्विनने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना आणखी यश न मिळू देता रोहितबरोबर दिवसअखेरपर्यंत फलंदाजी केली.
दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारताच्या ६ बाद ३५४ धावा झाल्या होत्या. रोहित शर्मा १२७ धावांवर खेळत आहे. वेस्ट इंडिजकडून शेन शिलिंगफोर्डने चार बळी मिळविले. तर, बेस्ट आणि कॉटरेल यांनी प्रत्येकी एक बळी मिळविला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.