www.24taas.com, झी मीडिया, लंडन
टीम इंडियांचे तारे सध्या चमकत असले तरी टीम इंडियाची ही प्रगती काही लोकांच्या डोळ्यात खुपत आहे. इंग्लडचा माजी कर्णधार माइक आथर्टन याने कॉमेंट्री करताना भारतीय क्षेत्ररक्षक गाढवांचे हरीणं कशी झाली अशी संतापजनक टीप्पणी केली आहे.
आथर्टन याच्या या वक्तव्यानंतर कोणीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. काही वर्षांपूर्वी इंग्लडचा माजी कर्णधार नासीर हुसैन याने टीम इंडियाच्या स्टार प्लेअर्सला गाढव म्हटले होते. त्यावेळी मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर नासीर हुसैन कॉमेंट्री करण्यास आला नव्हता.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सराव सामन्यात आणि खेळण्यात आलेल्या दोन सामन्यात भारताने चांगली कामगिरी केली आहे. यात सराव सामन्यात श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाला धुळ चारली. तर दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजला चांगले नमवले. या सामन्यात भारतीय क्षेत्ररक्षकांनी चांगली कामगिरी केली.
कधी केले आथर्टनने संतापजनक वक्तव्य
इंग्लड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळ्यात आलेल्या सामन्यात कॉमेंट्री करताना आथर्टन याने भारतीय क्रिकेटरांची तुलना जनावरांशी केली. नासीर हुसैन याने भारतीय टीमची प्रशंसा केल्यानंतर आथर्टन याने भारतीय खेळाडू गाढवाचे हरीण झाले असल्याची संतापजनक टीप्पणी केली.
२०११ मध्ये नासीर हुसैन यांनी भारताच्या काही खेळाडूंची तुलना गाढवाची केली होती. त्याची आठवण करून देताना आथर्टन म्हटला की तू या खेळाडूंना गाढव म्हटले होते ते आता हरणं झाली आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.