www.24taas.com, झी मीडिया, ढाका
बांगला देशातील ढाक्यात सुरू असलेल्या आशिया कप क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानसमोर भारताने २४६ धावांचं आव्हान ठेवलं आहे.
रोहित शर्मा, अंबाती रायडू आणि रविंद्र जाडेजाने यांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने २४६ धावांपर्यंत मजल मारली.
भारताला धावांचा डोंगर उभारता आला नसला, तरी भारताला हा विजय स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी महत्वाचा आहे. भारताने ५० षटकात ८ बाद २४५ धावा केल्या.
दुपारी दोन वाजता सामन्याला सुरूवात झाली, पाकिस्तानने नाणेफेक जिंकुन भारताला फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं, मात्र भारतीय फलंदाज एकानंतर एक बाद होत होते, त्यामुळे टीम इंडियाची धाव संख्या संथ गतीने सुरू होती.
मात्र यानंतर अंबाती रायडू आणि जाडेजाने अर्धशतकं करत डाव सावरला आणि भारताला २४५ पर्यंत धावसंख्या जमवता आली.
अंबाती रायडूने कठीण परिस्थितीत ५८ तर रविंद्र जाडेजाने ५२ धावा केल्या, जाडेजा नाबाद राहिला.
पाकिस्तानी बोलर्सने आज चांगली कामगिरी केली. सईद अहमदने तीन, मोहम्मद तल्हा आणि मोहम्मद हाफिजने प्रत्येकी दोन बळी घेतले, तर उमर गूलनेही एक विकेट पटकावली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.