www.24taas.com, झी मीडिया, कोलंबो
प्रदीर्घ काळापर्यंत आपला सहकारी कुमार संगकारा याच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर श्रीलंकेचा क्रिकेटर महेला जयवर्धने यानंही आंतरराष्ट्रीय टी-ट्वेन्टी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलीय.
बांग्लादेशमध्ये सुरु असलेल्या टी-ट्वेन्टी विश्व कप फॉर्मेटमध्ये हा आपला शेवटचा खेळ असेल, असं जयवर्धने यानं म्हटलंय.
संगकारानं मात्र आपण फ्रेंचायजी आधारित आयोजित खेळांमध्ये खेळत राहणार असल्याचं म्हटलं होतं... मात्र, जयवर्धने यानं अशी कोणतीही घोषणा केलेली नाही.
महान क्रिकेटर म्हणून गणतीत असलेल्या जयवर्धने यानं श्रीलंकेसाठी ४९ आंतरराष्ट्रीय टी-ट्वेन्टी मॅच खेळल्या आहेत. सरासरी ३१.७८ नुसार त्यानं १३३५ रन्स काढलेत. त्याचा स्ट्राईक रेट आहे १३४... ३६ वर्षांच्या जयवर्धने यानं टी-ट्वेन्टी मॅचमध्ये एक शतकदेखील ठोकलंय. २०१० साली टी-ट्वेन्टी विश्व कपमध्ये झिम्बॉम्वेविरुद्ध त्यानं १०० चा टप्पा गाठला होता. तसंच त्यानं याच फॉर्मेटमध्ये आठ अर्धशतकदेखील ठोकलेत.
क्रिकेटच्या तीनही रुपांमध्ये शतक ठोकणाऱ्या काही मोजक्याच क्रिकेटर्समध्ये जयवर्धने चाही समावेश आहे.
जयवर्धने २०१२ टी-ट्वेन्टी विश्व कपदरम्यान श्रीलंकन टीमचा कॅप्टन होता. यानंतर ही जबाबदारी त्यानं एन्जेलो मॅथ्यूज याच्याकडे सोपवली होती.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.