क्रिकेटर जेसी रायडरला मारहाण, रायडर कोमात

न्यूझीलंडचा क्रिकेटपटू जेसी रायडर याला बुधवारी रात्री ख्राईस्टचर्चमधील एका बार बाहेर जबर मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीमुळे तो कोमामध्ये गेला असून, त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

Updated: Mar 28, 2013, 09:46 AM IST

www.24taas.com, वेलिंग्टन
न्यूझीलंडचा क्रिकेटपटू जेसी रायडर याला बुधवारी रात्री ख्राईस्टचर्चमधील एका बार बाहेर जबर मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीमुळे तो कोमामध्ये गेला असून, त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
न्युझिलंड क्रिकेटर जेसी रायडर याला एका बारबाहेर जबर मारहाण झालीये. यामुळे त्याची कवटी तुटल्यानं त्याच्या मेंदूत रक्तस्त्राव झालाय. रेडिओ न्युझिलंडनं हे वृत्त दिलंय. ख्राइस्टचर्चमधल्या एका बारमधून बाहेर पडल्यानंतर रायडरची एका गटाशी बाचाबाची झाली.

चौघांनी त्याला जबर मारहाण केली. तो पूर्वी आयपीएलच्या पुणे वॉरिअर्स संघात होता. ताज्या ऑक्शनमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स संघानं रायडरला 2 कोटी 6 लाख डॉलर्सना विकत घेतलं होतं.