`आरसीए`च्या अध्यक्षपदी ललित मोदींची निवड

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) मंगळवारी चांगलाच झटका बसलाय. राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या (आरसीए) अध्यक्षपदी निवड झालीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 6, 2014, 11:15 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) मंगळवारी चांगलाच झटका बसलाय. राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या (आरसीए) अध्यक्षपदी निवड झालीय.
ललित मोदींनी लंडनमध्ये राहून आरसीएची निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत त्यांना विजय प्राप्त झालाय. या विजयामुळे ललित मोदी पुन्हा एकदा बीसीसीआयमध्ये एन्ट्री झालीय. आज दुपारी तीन वाजता आरसीएची एक बैठकही बोलावण्यात आलीय.
सुप्रीम कोर्टानं दिलेल्या आदेशानंतर आज आरसीएच्या निवडणूक निकाल जाहीर करण्यात आले. यामध्ये ललित मोदींची निवड झाल्याचं जाहीर करण्यात आलं. आरसीएची निवडणूक 19 डिसेंबर 2013 रोजी पार पडली होती. या निवडणुकीत ललित मोदी यांना 24 मतं मिळाली तर त्यांचे विरोधक रामपाल शर्मा यांना केवळ पाच मतं मिळू शकली.
ललित मोदींवर बीसीसीआयनं बंदी आणली होती. त्यामुळे, आरसीएवर ललित मोदींची निवड झाल्यामुळे नक्कीच बीसीसीआयला झटका बसलाय.
महत्त्वाचं म्हणजे, सुप्रीम कोर्टानं काही दिवसांपूर्वी राजस्थान क्रिकेट संघाच्या निवडणूक निकाल 6 मे रोजी घोषित करण्याचे निर्देश दिले होते. निकालांची घोषणा करण्यासाठी न्यायमूर्ति एन एम कासलीवार यांच्याकडे हे निकाल सीलबंद पाकिटात पाठवण्याचे आदेश न्यायालयानं दिले होते.
हा निकाल ललित मोदींच्या बाजुनं लागण्याची दाट शक्यता बीसीसीआयला होतीच. त्यामुळे त्यांनी हे निकाल जाहीर करण्याची घोषणा केली होती. या निवडणूक निकालांबद्दल कुणाला तक्रार असेल तर त्यानं योग्य ठिकाणी या निवडणुकीला आव्हानं द्यावं, असा निकाल यावर सर्वोच्च न्यायालयानं दिले होते.
सर्वोच्च न्यायालयानं नियुक्त केलेल्या पर्यवेक्षकाच्या देखरेखीखाली 19 डिसेंबर रोजी पार पडलेल्या निवडणुकीसाठी ललित मोदी यांना निवडणूक लढविण्याची परवानगी मिळाली होती.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.