www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची जादू चालेनाशी झाल्याने वायुदलाच्या ब्रॅण्ड अॅम्बेसिडरपदावरून त्याची उचलबांगडी करण्यात आलेय. त्यामुळे सचिनचे वायुदलातील विमान लॅंड करावे लागले आहे.
तरुणांना आकर्षित करण्यासाठी सचिनच्या प्रतिमेचा उपयोग होईल असे वायुदलाला वाटले होते. त्यामुळे वायुदलाने गाजावाजा करत सचिनला कॅप्टन बनविले होते. मात्र, सचिनच्या प्रतिमचा काहीच उपयोग होत नाही हे लक्षात येताच त्याची वायुदलाच्या ब्रॅण्ड अॅम्बेसिडरपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. सचिनची जागा ‘पिलाटस’ या नव्या प्रशिक्षण विमानाने घेतली आहे.
वायुदलाने सचिनला २०११ मध्ये ‘कॅप्टन’ ही मानद रँक बहाल केली होती. त्यानंतर त्याच्या छायाचित्राचा वापर सुरू केला होता, पण वायुदलाने आता आपल्या सर्व प्रचार मोहिमेतून सचिनला बाहेरचा रस्ता दाखविला आहे.
‘दिशा’ या वायुदलाच्या प्रचार शाखेत सचिनचे कॅप्टनच्या गणवेशातील चित्र लावण्यात आले होते. ते चित्रसुद्धा आता हटविण्यात आले आहे. त्यामुळे वायुदलातील सचिनची किर्ती संपुष्टात आलेय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.