www.24taas.com, नवी दिल्ली
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सांगितले की, 'जेव्हा युवराज सिंग हा लंडनमध्ये कँसरवर उपचार घेत होता तेव्हा युवराजला भेटण्यासाठी गेलेलो असताना मला भीती वाटत होती की, युवराज सिंगला पाहून त्याला रडू येईल की काय....'
युवराजचं पुस्तक ‘द टेस्ट ऑफ लाइफ’ यांचे काल प्रकाशन सचिन तेंडुलकरच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळेस सचिनने आपल्या मनातील भावना प्रकट केल्या. ‘जेव्हा मी लंडनमध्ये युवराजला गेलो होतो, तेव्हा मी माझ्या पत्नीला (अंजलीला) सांगितले की, युवीला भेटल्यानंतर मला त्याच्यासमोर अजिबात रडायचं नाही.... मी युवीला भेटलो आणि त्याला कडकडून मिठी मारली. त्यानंतर आम्ही जेवणाचा आस्वाद घेतला. मात्र युवी तेव्हा जसं जेवण घेत होता त्यानंतर मला विश्वास वाटला की, आता युवी लवकरच बरा होईल.
पुस्तक प्रकाशन सोहळ्यावेळी सचिन, टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी आणि युवा बॅट्समन विराट कोहलीने युवराजच्या कँसर लढ्याविषयी त्यांचे अनुभव सांगितले. आणि आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. यावेळेस सचिन मात्र भावूक झाला होता, जेव्हा मी पाहिलं की, माझी पत्नी युवराज सोबत डॉक्टरांच्या भाषेत बोलते आहे, तेव्हा माझा आणखी विश्वास वाढला आणि माझी खात्री पटली की, युवी संकटातून बाहेर आला आहे. युवी मला छोट्या भावासारखा आहे. आणि मी देवाला प्रश्नही विचारला की असं युवराजसोबतच का घडलं....