www.24taas.com , झी मीडिया, हरयाणा
मुंबई विरूद्ध हरयाणा रणजीचा सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने शानदार अर्धशतक झळकावले. या अर्धशतकाच्या जोरावर मुबंईने आपला विजय साकारला आणि सचिनला सहकाऱ्यांनी उचलून घेतलं.
सचिनचा हा शेवटचा रणजी सामना असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सचिनने आपल्या चाहत्यांना निराश केले नाही. सचिनने नाबाद ७९ धावांची संयमी रन्स करत आपल्या कामगिरीचा शेवटही चांगला केला. धवल कुलकर्णी यांने विजयी फटका मारल्यानंतर सहकाऱ्यांनी सचिनला खांद्यावर उटलून घेऊन मैदानाला फेरी मारून सचिनचे कौतुक केले.
मुंबईला हरयाणा संघाने २४० धावांचे टार्गेट दिले होते. या टार्गेट पाठलाग करताना मुंबईने सचिनच्या या अर्धशतकी खेळाच्या जोरावर तसेच कौस्तुभ पवार (४७) , अजिंक्य रहाणे (४०) यांनी दिलेल्या बहुमोल योगदानामुळे काल ६ बाद २०१ असे प्रत्युत्तर दिले. मुंबईला आता सामन्याच्या चौथ्या आणि अखेरच्या दिवशी विजयासाठी ३९ धावांची गरज होती.
अखेरची रणजी लढत खेळत असलेला सचिन दुसऱ्या डावात चमकदार खेळी करील अशी चाहत्यांना अपेक्षा होती. ही अपेत्रा सचिनने सार्थ ठरविली. सचिन, सचिन अशा आरोळ्या उपस्थित प्रेक्षकांमधून येत होत्या. सचिननेही प्रेक्षकांना आपल्या फलंदाजीने समाधान दिले.
रणजी कारकीर्दीतील त्याचे हे ११५वे अर्धशतक ठरले. जोगिंदर शर्माच्या गोलंदाजीवर स्क्वेअर लेगमधून दोन धावा काढून सचिनने या अर्धशतकाची नोंद केली आणि प्रेक्षकांनीही उभे राहून सचिनला अभिवादन केले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.