www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
बीसीसीआयला सुप्रीम कोर्टानं चांगलाच दणका दिला आहे. सुप्रीम कोर्टानं मुंबई हायकोर्टानं दिलेल्या निर्णयावर स्थगिती देण्यास नकार दिला आहे.
आता याबाबतची पुढली सुनावणी 29 ऑगस्टला होणार आहे. मुंबई हायकोर्टानं आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी स्थापन केलेली द्विसदस्यीय समिती बेकायदेशीर ठरवली होती. याबाबत बीसीसीआयनं सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. मात्र, आता सुप्रीम कोर्टानं स्थगिती देण्यास नकार देत बीसीसीआयला मोठा झटका दिला आहे.
तत्पूर्वी, बीसीसीआयनं नेमलेल्या चौकशी द्विसदस्यीय समितीनं स्पॉट फिक्सिंग प्रकरणात चेन्नई टीमचा सीईओ गुरुनाथ मय्यपन आणि राजस्थान रॉयल्सचा को-ओनर राज कुंद्रा यांना क्लीन चिट दिली होती. मात्र, या समितीच्या रिपोर्टवर बिहार क्रिकेट असोसिएशनने आक्षेप घेत हाय कोर्टात धाव घेतली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.