www.24taas.com, मुंबई
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला ऑस्ट्रेलियाचा सर्वाधिक प्रतिष्ठित मानला जाणारा `ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया` पुरस्कार उद्या मुंबईत प्रदान करण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान जुलियन गिलार्ड या भारतीय दौ-यावर आल्या होत्या त्यावेळी त्यांनी सचिनला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल अशी घोषणा केली होती.
दरम्यान सचिनला हा पुरस्कार देण्याबाबत ऑस्ट्रेलियात काहीजणांनी टीका केली होती. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मॅथ्यू हेडनने सचिनला पुरस्कार जाहीर झाल्याने तीव्र विरोध दर्शवला होता. तर ऑस्ट्रेलियाच्या एका खासदारानेही सचिनला पुरस्कार देण्याला विरोध केला होता.
याशिवाय काही ऑस्ट्रेलियन नागरिकांनी हरभजन सिंग आणि ऍन्ड्रयु सायमंडस यांच्यामध्ये रंगलेल्या मंकीगेट प्रकरणात सचिन महत्त्वपूर्ण साक्षीदार असल्यानं त्याला या सन्मानाने गौरवण्यात येऊ नये असं मत व्यक्त केल होत.