चाळीतील जिव्हाळ्याची दिवाळी... (लेख)

माझा मोबाईल खणाणला आईचा फोन होता. आईने दिलेली बातमी तशी धक्कादायकच होती. `आपली चाळ तोडण्यात येणार आहे. आपल्याला आपली चाळीतली रिकामी असलेली खोली सोडावी लागणार... बिल्डरने पैसे देऊ केलेत.` एक क्षण मनात धस्स झालं डोंबिवलीतली हीच चाळ... जिथे आम्ही लहानाचे मोठे झालो..... ती पडणार! हे ऐकताच, डोळ्यासमोर त्यासगळ्या चांगल्या वाईट आठवणी तराळल्या.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 1, 2013, 09:51 PM IST

.

माझा मोबाईल खणाणला आईचा फोन होता. आईने दिलेली बातमी तशी धक्कादायकच होती. `आपली चाळ तोडण्यात येणार आहे. आपल्याला आपली चाळीतली रिकामी असलेली खोली सोडावी लागणार... बिल्डरने पैसे देऊ केलेत.` एक क्षण मनात धस्स झालं डोंबिवलीतली हीच चाळ... जिथे आम्ही लहानाचे मोठे झालो..... ती पडणार! हे ऐकताच, डोळ्यासमोर त्यासगळ्या चांगल्या वाईट आठवणी तराळल्या.

सदगुरू सेवा सदन ही आमची बैठी चाळ. त्यात आम्ही सगळी चिल्लीपिल्ली... एकाच वयाची.. त्यामुळे दिवाळीत खूप धमाल असायची... दिवाळीला सुरूवात व्हायची ती घरातल्या आणि अंगणातल्या साफसफाईने... आज कोणाच्या घरी साफसफाई असेल त्यावरुन आपल्या घरी साफसफाई कधी? याची गणिते बांधली जायची. साफसफाई सुरू असतांना बाजुच्या काकू ‘साफसफाई वाटत?’ अस विचारायच्या.. हा प्रश्न जरी कोणी विचारला तर असं वाटायचं. जणू अर्ध जगच जिंकलं. आई नेहमी म्हणते की दिवाळीचे स्वागत स्वच्छतेने करायचे असते. त्यामुळेच कदाचीत ही सवय लागली....
साफसफाई बरोबर रांगोळीसाठी खास ओटा तयार करुन घेणं ओघाने आलचं. ओटा म्हणजे दारासमोरची जागा... ती जागा प्रशस्थ असणं आमच्या दृष्टीने खूपच महत्वाचं होत कारण इतरांपेक्षा आमच्या घरासमोर मोठ्ठी रांगोळी असावी ही आमची अपेक्षा होती.

आता दिवाळी आहे तर किल्ला नको का? आमच्या दोन चाळी होत्या सदगुरू सेवा सदन नंबर 1 आणि 2 15च्या आसपास बि-हाड ह्या दोन्ही चाळीत होतो. पण मग 15 किल्ले थोडीच बांधणार म्हणून सर्वांचा मिळुन एक किल्ला प्रत्येक वर्षी एका कुटुंबाच्या घरासमोर हा किल्ला बांधायचा असं आमचे ठरलेलं होते. मग ह्यावर्षी कोणासमोर बांधायचा मागच्या वर्षी इनामदारांच्या घरी तर ह्यावर्षी आमच्या नाहीतर शेट्टींच्या घरासमोर चालेल अस करत जागा ठरली की आता पैशांचा प्रश्न उपस्थित राहीला. त्यासाठी सुद्धा आम्ही शक्कल काढली होती. सर्वजण जास्तीत जास्त 10 ते 20 रुपये वर्गणी काढत होतो. आणि फुकटात माती मिळते म्हणून माती आणयला आम्ही कोपर गावात जायचो.

आमची चढाओढ ह्यावरच न थांबता आता नवीन ड्रेस कसा घ्यायचा यावरही होता. त्यासाठी मी, माझी बहीण भाऊ आणि आमचे मित्र मैत्रीणी मिळून आपण कोणता ड्रेस घ्यायचा यावर सगळे चर्चा करत. त्याच प्रकारचा ड्रेस घ्यावा यासाठी पाठी लागत होतो. किंवा असं म्हणा ना की आमचा ड्रेस कोड ऑलरेडी ठरलेला असायचा त्यात कुठलाही बदल आई-वडील करायचे नाहीत.. नाही नाही.... कोणी बदल करूचच शकत नव्हते. मग काहीही करा दरवर्षी असचं रुटीन होतं.

सर्वांसाठी महत्वाच्या कोणाच्या घरासमोर मोठ्ठी रांगोळी काढणार ह्यावर जास्त चढाओढ.... पहिल्यांदा मला रांगोळी घालता यायची नाही. तेव्हा माझी आई कित्ती छान रांगोळी काढते, यावरुन आम्ही चर्चा करायचो. नंतर आम्हीच रांगोळ्या काढायला लागलो. तेव्हा दुस-यांपेक्षा माझ्या घरासमोरील रांगोळी काढायची ह्यासाठी आधीच प्लॅनींग असायची. मात्र रांगोळी काढण्यात आमच्या बाजुच्या कांबळी काकूंचा हात आजतागायत कोणीही धरू शकलेला नाही. या रांगोळ्या घालण्याचे कार्यक्रम धनत्रयोदशीपासून सुरू व्हायचे.

दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे परीक्षेपेक्षाही खूप महत्वाचा पहाटे उठून पहिला बॉम्ब कोण लावणार ह्यासाठी आमची लगबग असायची. सकाळी जे कोणी लवकर उठेल त्यांनी सर्वांना उठवायचे, नाहीतर झोपून राहले तर पहिला बॉम्ब कोणी लावला हे कस ठरणार म्हणून दरवर्षी न चुकता पहाटे पहाटे सगळ्यांची दार वाजवत सर्वांना उठवायचे (सध्या जी टीव्हीवर जाहिरात सुरू आहे ना एक लहान मुलगा उठा उठा दिवाळी आली.... करत प्रत्येक घरांची दारे वाजवतो अगदी तस्सच) अभ्यंगस्नान झालं की लगेचच बाहेर येउन फटाके लावायचे आणि चाळीतल्या प्रत्येक घरात जाउन दिवाळी शुभेच्छा द्यायच्या एवढच काम होतं. थोड मोठं म्हणजे कॉलेजमध्ये गेल्यानंतर या रुटीनमध्ये एक एक्टिव्हीटी जोडली गेली, ती म्हणजे फडकेव जायचं गणपती मंदिरात... फडकेवर म्हणजे फडके रोडवर (डोंबविलीकरांना फडके रोड म्हणजे काय हे सांगण्याची गरज नाही ) कॉलेजचे सगळे मित्रमैत्रिणी फडकेवरच भेटत होतो. आजही जरी गेलो तरी सर्वजण नक्की भेटतील...... अगदी कॉलेज सुरू असेपर्यंत हे सातत्याने सुरू होत न चुकता किंवा न चुकविता.
मात्र या रुटीनला खंड पडला जे