www.24taas.com, मुंबई
विद्यार्थ्यांच्या करियरची दिशा निश्चित करणारी १२ वीची परीक्षा आजपासून राज्यभरात सुरु होते आहे. राज्यभरातल्या ५ हजार ८२८ परीक्षा केंद्रावर ती घेतली जाणार आहे. १३ लाख ४६ हजार विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.
यंदा पहिल्यांदाच प्रत्येक विषयाच्या अभ्यासाठी एक दिवसाची सुटी देण्यात आली आहे. परीक्षेला बसणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांमध्ये सायन्स शाखेचे ४ लाख २२ हजार, कॉमर्सचे ३ लाख ४८ हजार आणि आर्ट्सचे ५ लाख पंधरा हजार विद्यार्थी आहेत. व्यवसाय अभ्यासक्रमाचे ५९ हजार विद्यार्थी आहेत.
बोर्डाने यंदा प्रथमच प्रत्येक विषयाच्या पेपर आधी एक दिवस सुट्टी दिल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. कारण की, त्यांना प्रत्येक विषयाचा अभ्यास करता येणार असल्याने विद्यार्थी देखील बऱ्यापैकी खूश होतील.