www.24taas.com, मुंबई
मुंबई विद्यापीठ पेपरफुटीप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आलीय. मुंबई क्राईम ब्रांचनं ही कारवाई केली असून अटक झालेल्यांमध्ये विद्यापीठ कर्मचा-यांचाही समावेश आहे. आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.
पेपर फोडणाऱ्यांमध्ये विद्यापीठातल्या कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग असल्याचं स्पष्ट झालं आहे. मुंबई विद्यापीठात प्रश्नपत्रिका छापल्यानंतर त्या संबधित महाविद्यालयांना पाठवल्या जातात.
प्रश्नपत्रिका पाठवताना त्यातल्या गठ्ठ्यांमधून प्रश्नपत्रिका चोरल्याचा पोलिसांचा संशय आहे. या पेपरफुटी प्रकरणात विद्यापीठाबाहेरील लोकांचाही सहभाग असल्याचा पोलिसांचा संशय होता. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचच्या पथकानं तपास करीत आठजणांना अटक केली आहे.