शाळा सुटली, पाटी फुटली!

राज्यात पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक स्तरावर पट नोंदणीच्या किंवा शाळा प्रवेशाच्या दरात वाढ झाली असली तरी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर शाळा सोडणाऱ्यांच्या दरात मोठी वाढ झाल्याचं उघडकीस आलं आहे.

Updated: Oct 20, 2011, 12:27 PM IST

झी २४ वेब टीम, मुंबई

 

राज्य सरकार २०११ सालच्या खानेसुमारीच्या आधारे साक्षरतेच्या दरात वाढ झाल्याचे दावे करत असली तरी वास्तव परिस्थिती भयावह आहे. राज्यात पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक स्तरावर पट नोंदणीच्या किंवा शाळा प्रवेशाच्या दरात वाढ झाली असली तरी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर शाळा सोडणाऱ्यांच्या दरात मोठी वाढ झाल्याचं उघडकीस आलं आहे.

 

महाराष्ट्रातील शहरे तसेच गावांमध्ये माध्यमिक स्तरावर शाळा सोडणाऱ्यांचे प्रमाण ३८ टक्के इतके प्रचंड आहे. नॅशनल सॅम्पल सर्व्हेने केलेल्या पाहणीच्या आधारे एका बिगर शासकीय संस्थेने केलेल्या अभ्यासात हे वास्तव समोर आलं आहे. शिक्षण क्षेत्रात नियमीत अंतराने सर्वेक्षण होत नसल्याने या  पैलूकडे वारंवार दुर्लक्ष्य होतं, असं लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट या स्वंयसेवी संस्थेच्या विली डॉक्टर यांनी सांगितले.

 

[caption id="attachment_2920" align="alignleft" width="300" caption="शाळा सुटली, पाटी फुटली!"][/caption]

राज्यातील शहरे तसेच खेडेगावांमधील शिक्षण क्षेत्रातील वास्तव परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी सेनसस (खानेसुमारी) आणि एनएसएस आकडेवारी आणि माहितीच्या आधारे आपल्या संस्थेने गेले काही वर्षे केल्याचेही त्यांनी सांगितले.  प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थी नियमीत उपस्थिती लावतात आणि शिक्षण पूर्ण करत असली तरी स्तरावर त्यानंतर मोठ्या प्रमाणावर शाळेला रामराम करत असल्याचं पाहून आम्हांला धक्का बसल्याच्या डॉक्टर म्हणाल्या. त्यामुळेच अगदी कमी संख्येने मुले उच्च शिक्षण पूर्ण करतात.

 

एनएसएसच्या २००८-०९ सर्वेक्षणानुसार राज्यात माध्यमिक शाळातील गळतीचे प्रमाण ३८ टक्के इतके प्रचंड आहे. गावांमध्ये हे प्रमाण ७० टक्के तर शहरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण ३० टक्के आहे. सरकारने शिक्षणाचा हक्क तसेच सर्व शिक्षण अभियान राबवल्यानंतरही गळतीचे मोठे प्रमाण आश्चर्यकारक एका शिक्षण तज्ञाने म्हटलं आहे. सध्या आपला भर मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेण्यावर असला तरी पदवी शिक्षण पूर्ण होईपर्यंत विद्यार्थी टिकतील यावरही आपण लक्ष केंद्रीत करणं गरजेचं असल्याचं विली डॉक्टर यांचे म्हणणे आहे.

 

सध्या आपली संस्था ग्रामीण भागात जिथे शाळा सोडणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे तिथे लक्ष देत असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं. विद्यार्थी आणि पालक यांना शिक्षणाचे महत्व समजलं पाहिजे. तसेच कौशल्य आधारीत शिक्षण देणं गरजेचं आहे त्यामुळे विद्यार्थ्याला उपजिविका करता येईल.

 

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या विद्यार्थ्यांनी २००७ साली केलेल्या एका अभ्यासानुसार उच्च माध्यमिक शिक्षण घेतलेली व्यक्ती १४३.३९ पैसे इतका रोजगार मिळवू शकते त्या तुलनेत अशिक्षित व्यक्तीला दर दिवशी ६०.४२ पैसेच इतकाच रोजगार मिळतो.
भविष्यातील आव्हानांना सामर्थ्याने पेलायची असतील तर देशात कौशल्य आणि गुणवत्ता विकसीत होणे ही काळाची गरज असल्याचे विली डॉक्टरांचे म्हणणे आहे. सरकारने गळतीवर तातडीने आणि प्रभावी उपाययोजना करण्याविषयी गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.