TY.B.comची फेरपरीक्षा होणारच- हायकोर्ट

TY.Bcomची फेरपरीक्षा होणार आहे. मुंबई हायकोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान कोर्टानं हा निर्णय दिला आहे. फेरपरीक्षा घेऊ नये अशा आशयाची याचिका साडेचारशे विद्यार्थ्यानी दाखल केली होती.

Updated: Apr 4, 2012, 01:55 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

TY.Bcomची फेरपरीक्षा होणार आहे. मुंबई हायकोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान कोर्टानं हा निर्णय दिला आहे. फेरपरीक्षा घेऊ नये अशा आशयाची याचिका साडेचारशे विद्यार्थ्यानी दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टानं फेरपरीक्षा घ्यावी लागणारच असा निर्णय दिला आहे.

 

TY.Bcomचा ह्युमन रिसोर्सच्या पेपर भिवंडीच्या बीएनएन कॉलेजमध्ये फुटला होता. त्यामुळं येत्या ११ तारखेला पुन्हा तो पेपर घेण्या फेरपरीक्षेविरोधात विद्यार्थ्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. पेपर फुटल्यानं ह्युमन रिसोर्सच्या पेपरची फेरपरीक्षा घेतली जाणार आहे. मात्र, कॉलेजच्या चुकीची शिक्षा ८५ हजार विद्यार्थ्यांना का, असा सवाल ४५० विद्यार्थ्यांनी केला आहे.

 

TY.Bcom चा ह्युमन रिसोर्सच्या फेरपरीक्षेविरोधात विद्यार्थ्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली असली तरी फेरपरीक्षा होणारच आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. पेपर फुटल्यानं ह्युमन रिसोर्सच्या पेपरची फेरपरीक्षा घेतली जाणार आहे.