यापुढे स्पोर्ट्सचे २५ मार्क नाही- शिक्षणमंत्री

स्पोर्ट्स कोट्यातील गुण यानंतर सगळ्यानाच मिळणार नाही. अशी आज शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी घोषणा केली आहे. यापुढे १२वी पर्यंत स्पोर्ट्सचे गुण सरसकट मिळणार नाहीत. जे विद्यार्थी नापास होतील त्यांना पास होण्यासाठीच स्पोर्ट्सचे २५ गुण मिळणार आहेत.

Updated: Apr 2, 2012, 06:56 PM IST

www.24taas.com, मुंबई

स्पोर्ट्स कोट्यातील गुण यानंतर सगळ्यानाच मिळणार नाही. अशी आज शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी घोषणा केली आहे. यापुढे १२वी पर्यंत स्पोर्ट्सचे गुण सरसकट मिळणार नाहीत. जे विद्यार्थी नापास होतील त्यांना पास होण्यासाठीच स्पोर्ट्सचे २५ गुण मिळणार आहेत.

टॉपर्सना स्पोर्ट्सचे गुण मिळणार नाहीत. शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी विधानपरिषदेत ही घोषणा केली. १२वी पर्यंत स्पोर्ट्सचे गुण सरसकट मिळणार नाहीत. केवळ उत्तीर्ण होण्यासाठीच स्पोर्ट्सचे गुण मिळणार असल्याने नापास होणाऱ्या विद्य़ार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे. स्पोर्ट्सचे २५ गुण असतात.

त्यामुळे हे गुण फार महत्त्वाचे असल्याने अनेक विद्यार्थ्यांना टक्केवारीसाठी देखील हे गुण महत्त्वाचे ठरतात. मात्र शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डांनी विधानपरिषदेत घोषणा केल्याने इतर विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.