एका वेळी सापाची २२ पिल्लं

अत्यंत दुर्मिळ अशा फुरसे जातीच्या सापाने धुळ्यातल्या सर्पविहार संस्थेत 22 पिल्लांना जन्म दिलाय. ही मादी आणि तिची पिलं स्वस्थ असून पिलांची लांबी 40 ते 50 सेंमी एवढी आहे.

Updated: May 13, 2012, 10:53 PM IST

 www.24taas.com, धुळे

 

अत्यंत दुर्मिळ अशा फुरसे जातीच्या सापाने धुळ्यातल्या सर्पविहार संस्थेत 22 पिल्लांना जन्म दिलाय. ही मादी आणि तिची पिलं स्वस्थ असून पिलांची लांबी 40 ते 50 सेंमी एवढी आहे. फुरसे जातीचा साप हा नाग आणि घोण जातीच्या सापांपेक्षा जास्त विषारी असतो. एरव्ही फुरसे जातीची मादी एका वेळेस 13 ते 15 पिल्लांना जन्म देते. मात्र या मादीने 22 पिल्लांना जन्म दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येतंय. सध्या सर्पविहार संस्थेचे पदाधिकारी या पिलांची काळजी घेतायत. येत्या काही दिवसांत मादी आणि पिलांना वनाधिका-यांच्या उपस्थितीमध्ये जंगलात सोडण्यात येणार आहे.

 

व्हिडिओ पाहा :

[jwplayer mediaid="100324"]