नालेसफाईसाठी बालमजूर वेठीला

पावसाळा तोंडावर आला असल्याने कल्याण डोंबिवलीतील शहरातील नालेसफाईची आणि गटार सफाईची कामे सुरु असून या कामासाठी ठेकेदाराने चक्क बाल कामगार वापरल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला आहे. झी 24 तासनंही कल्याणच्या सहाय्यक कामगार आयुक्तांना याबाबत विचारणा केली असता अतिशय बेजबाबदार उत्तर मिळाली.

Updated: Jun 11, 2012, 03:42 PM IST

www.24taas.com, कल्याण

 

पावसाळा तोंडावर आला असल्याने कल्याण डोंबिवलीतील शहरातील नालेसफाईची आणि गटार सफाईची कामे सुरु असून या कामासाठी ठेकेदाराने चक्क बाल कामगार वापरल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला आहे. झी 24 तासनंही कल्याणच्या सहाय्यक कामगार आयुक्तांना याबाबत विचारणा केली असता अतिशय बेजबाबदार उत्तर मिळाली. तसंच कारवाई कधीपर्यंत होणार यावरही ‘माहित नाही’ अशा पद्धतीचं उत्तर मिळालं

 

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या 'ब' प्रभाग क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या चिकणघर मधील ‘जय भीम नगर’ परिसरात महापालिकेतर्फे नालेसफाईची आणि गटारांची साफसफाई कामे सुरु आहेत. ही कामे करताना एकाच ठिकाणी 14 वर्षाखालील ३ते ४ मुले गटार सफाई करीत असल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आले. नागरिकांनी याबाबत पत्रकारांना कळविले. पत्रकारांनी घटनेची शहानिशा केली. याबाबत झी 24 तासनं कल्याणचे सहाय्यक कामगार आयुक्त अशोक चिवटेंना विचारलं असता त्यांनी बेजबाबदार उत्तरं दिली.

 

इतकंच नव्हे तर कारवाई कधी करणार यावरही त्यांनी ठोस उत्तर दिलं नाही. या प्रकारामुळे ज्या यंत्रणांनी बालमजुरीविरोधात जनजागृती करणे अपेक्षित आहे ते महापालिका प्रशासनच एकप्रकारे बाल कामगार प्रथेला पाठबळ देत असल्याचे दिसून येत आहे.