पृथ्वीपासून १५ कोटी किलोमीटर दूर अंतरावर, १५ कोटी डिग्री सेल्सियस तापमान... सूर्यापर्यंत पोहचण्यापूर्वीच कोणतीही वस्तू जळून राख होईल... पण, इतकं भयंकर तापमान असलं तरी या ब्रम्हांडात आणखी कोणी तरी आहे जो पृथ्वीच्या तुलनेत सूर्याच्या कितीतरी पट जवळ आहे. शतकातून एकदाच तो पृथ्वी आणि सूर्य यांच्या मधोमध उभा ठाकतो आणि थेट सूर्याशी सामना करतो...
शतकातील सर्वात सुंदर दृष्य
बुधवारी सकाळी सूर्य आणि शुक्र हे आमने- सामने येणार आहेत. पृथ्वी, शुक्र आणि सूर्य हे सरळ एका रेषेत येणार आहेत. पृथ्वी आणि सूर्य यांच्या बरोबरमध्ये शुक्र असणार आहे. हा अनोखा नजारा शतकातून एकदाच दिसणार आहे. तब्बल सात तासापर्यत सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये शूक्र असणार आहे. सूर्याशी सामना करण्याची तयारी शुक्राने केली आहे. सहा जूनच्या सकाळी आकाशातील हा अदभुत नजारा तुम्हाला-आम्हाला पाहाता येणार आहे. सूर्य आणि शूक्र यांच्या भेटीचं चित्र ज्याला ‘व्हिनस ट्रांजिट’ असं म्हणतात असं दृश्य ६ जूननंतर तब्बल ११५ वर्षांनी दिसणार आहे.
यापूर्वीही अशी घटना घडली आहे. २००४ मध्ये शुक्राने सूर्याचा सामना केला होता. त्यावेळी हे दृष्य पाहायला मिळालं होतं. आग ओकणाऱ्या सूर्यासमोर शुक्र एखाद्या काळ्या डागाप्रामाणे भासत होता. जवळपास सहा तास सगळ्या जगातील वैज्ञानिकांनी सूर्य आणि शुक्र यांच्या या भेटीचा अनोखा नजरा याच देही याच डोळा अनुवला होता. या घटनेचा अभ्यास केल्यानंतर अंतराळातील आणखी काही घटनांची माहिती मिळविण्यात वैज्ञानिकांना यश आलंय. त्यामुळेच यावर्षीही हे सात तास खगोल शास्त्रज्ञांसाठी अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत.
पृथ्वीप्रमाणेच शुक्रही सूर्याभोवती फिरत असतो. पण, पृथ्वीच्या तुलनेत तो सूर्याच्या खूपच जवळ आहे. बुधवारी सूर्याला प्रदक्षिणा घालत असतानाच शुक्र अशा ठिकाणी येऊन पोहचेल जिथं शुक्र, पृथ्वी आणि सूर्य हे तिन्ही ग्रह सरळ एका रेषेत असतील. तसेच शुक्र हा पृथ्वी आणि सूर्य यांच्या मधोमध असणार आहे. त्यामुळे भारतात जेव्हा सुर्योदय होईल तेव्हा सूर्यामध्ये एक लहानसा काळा डाग पहायला मिळेल. तो डाग म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तो शुक्र ग्रह असणार आहे. पृथ्वी, शुक्र आणि सूर्य हे तिन्ही ग्रह एका रेषेत येण्याची ही प्रक्रिया असणार आहे. सूर्यग्रहणात चंद्र जवळ आल्यामुळे पृथ्वीवर पडणारा सूर्यप्रकाश अडवला जातो. त्यामुळे दिवसा रात्र झाल्याचा भास होतो. मात्र, यावेळी चंद्रा ऐवजी शुक्र हा पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये असणार आहे.
घाबरू नका; वैज्ञानिकांचं आवाहन
सुर्यावर शुक्राचा डाग दिसणार म्हटल्यावर अंधश्रद्धाळूंच्या पोटात गोळा आल्याशिवाय राहणार नाही. पण, यामध्ये घाबरण्यासारखं काहीही नसल्याचं वैज्ञानिकांनी सांगितलंय. कारण ही ब्रम्हांडातील एक अदभूत घटना असून तिला विज्ञानाच्या दृष्टीकोणातून पाहण्याची आवश्यकता असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. या घटनेतूनच सूर्य आणि पृथ्वी यांच्यातलं अंतर मोजण्यात खगोलतज्ज्ञांना यश आलंय. सर्वात आधी केपलरने १६३१ आणि १६३९ मध्ये व्हिनस ट्रांझीटविषयी अंदाज व्यक्त केला होता. ६० वर्षांच्या कालावधीत दोन वेळा शुक्र सूर्याजवळून गेल्याचं केपलरने म्हटलं होतं. २४ नोव्हेंबर १६३९ रोजी पृथ्वी आणि सूर्य यांच्यामधोमध शुक्र आला होता. ही घटना जेरेमिया हॉरेक आणि विलियम क्राँब्ट्री या ब्रिटनमधी