www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
जागतीक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आपण राज्यातील पर्यावरणाचा आढावा घेणार आहोत मात्र जगाने भारतातील ज्या पश्चिम घाटाची दखल घेतली तो पश्चिम घाट आहे तरी कसा ? उंच-उंच डोंगर...घनादट जंगलं.....विविध प्रकारचे प्राणी , आणि पक्षी ...हजारो प्रकारच्या वनस्पती...ही आहे भारतातील महान भौगोलीक पर्वतश्रृंखला...संयुक्त राष्ट्र संघाच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेनं पश्चिम घाटाला दुर्मिळ जागतीक वारसा म्हणून घोषित केलंय...
भारताच्या नकाशावर डावीकडं महाराष्ट्र, गुरजरात आणि गोवापासून खाली कन्याकुमारी पर्यंत जाणारी एक रेषा दिसते..ही रेषा म्हणजे पश्चिम घाट असून १६०० किलोमीटर लांबीचा आणि १०० किलोमीटर रुंदीचा हा परिसर आहे...जैव विविधतेनं संपन्न असलेलाहा परिसर जागतिक हॉटस्पॉट म्हणून ओळखला जातो...हिमालय पर्वत रांगापेक्षाही पश्चिम घाट जूना असून भारतातील २४ कोटी जनतेची तहान भागवण्याचं काम पश्चिम घाट वर्षानुवर्षे करत आली आहे.. पश्चिम घाट परिसर मोठ्या प्रमाणात वन्यजीव संपदा असून १३९ प्रकारचे सस्तन प्राणी,१७९ प्रकारचे उभयचर प्राणी,५०८ जातेचे पक्षी आढळतात..पश्चिम घाटाचं वैशिष्ट्य म्हणजे इथ ६ प्रकारचे सस्तन प्राणी ,१६ जातीचे पक्षी आणि ८४ प्रजातीचे उभयचर केवळ याच प्रदेशात आढळतात..त्यामध्ये काही फुलपाखरं आणि सापांच्या जातीचा समावेश आहे..
महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पर्वत रांगांपासून पश्चिम घाटाला सुरुवात होते..त्यामध्ये माथेरान, लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर पाचगणी, अंबोली घाट यांचा समावेश आहे..महाराष्ट्रात याला सह्याद्रीची पर्वत रांग म्हणून ओळखलं जातं तर कर्नाटक आणि केरळात त्याला साहया पर्वतम् म्हटलं जातं...
जगातील आठ प्रमुख दुर्मिळ जैव विविधतेनं संपन्न असलेला प्रदेशापैकी पश्चिम घाट एक असून गेल्या काही वर्षात बेसमुर बांधकाम तसेच पर्यावरणाकडं दुर्लक्ष केल्यामुळे हळूहळू पश्चिम घाटाची सौंदर्य कमी होवू लागलंय..पश्चिम घाटात सुरुवातीच्या काळात असलेल्या वनस्पतींचा केवळ सात टक्केचं भाग उरला असून झाडं, झु़डपं आणि प्राण्यांची संख्या कमी होत आहे....
महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या रांगापासून सुरु होणारा पश्चिम घाट थेट कन्याकुमारी पर्यंत जावून पोहोचतो..केरळमधील पेरीयर अभरण्यातील हा प्रदेश जैवविविधतेनं संपन्न असून जागतीक पातळीवर त्याला ह़ॉटस्पॉट म्हणून ओळखलं जातं..आज आपण या पेरीयर अभयरण्याची सफर करणार आहोत...
महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पर्वतराजीपासून सुरु झालेला पश्चिम घाट थेट केरळ पर्यंत पसरला आहे..पश्चिम घाटाने केरळचा भूभागही जैवविविधतेनं संपन्न केलाय..केरळ मधील पेरीयर टायगर रिझर्व अँड ईरवीकोलम नॅशनल पोर्कही याच पश्चिम घाटात वसला आहे...इथलं निसर्ग सौंदर्य डोळ्यात साठवून ठेवावं असंच आहे..विविध प्राणी आणि पक्षांचं हे आश्रय स्थान आहे...हा नॅशनल पार्क पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र बनलं आहे..
आज हा परिसर पेरीयर टायगर रिझर्व पार्क म्हणून ओळळा जात असला तरी १८८७मध्ये इथली परिस्थिती काही वेगळीच होती.. तत्कालीन मद्रास राज्याला पाणी पुरवठा करण्यासाठी ब्रिटिश सरकारने केरळचे राजे त्रावणकोर यांच्या संमतीने पश्चिम घाताटल्या पेरीयर नदीवर धरण बांधण्याचा प्रस्ताव मांडला..त्यानंतर १८९५मध्ये मुल्लपेरीयर धरणाची निर्मिती करण्यात आली..जैवविविधतेच्या दृश्टीने हा भूभाग अत्यंत संपन्न होता..मात्र प्राण्यांच्या शिकारीचे प्रकार सुरुच होते..वन्यजीवांची शिकार रोखण्यासाठी स्वातंत्र्याननंतर या प्रदेशाला अभयरण्याचा दर्जा देण्यात आला..या प्रदेशात वाघांची संख्या लक्षणीय होती..त्यामुळे हा भूभाग वाघांसाठी संरक्षीत करण्यात आला.. पुढे १९८२ मध्ये पेरीयर राष्ट्रीय उद्यानाची स्थापना करण्यात आली..आज केरळ सरकारकडून या परिसरात प्राण्यांच्या संरक्षणासोबतच पर्यटनालाही चालना देण्याचा प्रयत्न केला जात आहे...हे अभयरण्य असल्यामुळे पर्यटकांच्या मुक्त वावरावर इथं बंदी आहे..मात्र बोट सफारीतून तुम्हाला इथल्या जैव संपत्तीचं दर्शन घेता येतं..
मध्य केरळच्या इडूक्की जिल्ह्यातील टेकडी भागात कार्डमम आणि पंडालम हिल परिसरात हे जंगल पसरलं आहे..या परिसराच्या दुस-या बाजूला तमिळनाडू राज्य आहे..समुद्र सपाटीपासून साडे पाच हजार फुटावंर हे सदाहरित जंगल वसलं आहे..पेरियर आणि पंबा नदीच्या खो-यामुळे हा भूभाग अधिक संपन्न झाला आहे..सुमारे साडे सहा हजार फुटांचं कोट्टमलई शिखरही याच जंगलात आहे..या परिसराला दुहेरी मान्सूनचं वरदान लाभलं असून जून ते डिसेंबर या कालावधीत वरुनराजा मन