जियाच्या आत्महत्येनंतर जियाची आई राबीया खान यांनी जियाचं सहा पानी चिठ्ठी मिळाल्याचा दावा केलाय..जियाच्या आत्महत्येला तिचा प्रियकर सूरज जबाबदार असल्याचं आरोप राबीया खान यांनी केलाय.
बॉलीवूड अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्येनंतर सहा दिवसांनी जियाची आई राबीया खान यांनी या प्रकरणात गौप्यस्फोट केला..जियाच्या आत्महत्येला तिचा बॉयफ्रेंड सूरज पांचोली जबाबदार असल्याचा आरोप राबीया खान यांनी केली.. जियाने लिहिलेलं शेवटचं पत्र जियाच्या बहिणीला नुकतचं सापडलंय...त्यामध्ये जियाने आपल्या आत्महत्येचं कारण स्पष्ट केलंय..जिया खानच्या आईने हे पत्र पोलीसांच्या हवाली केलं..तसेच राबीया खान यांनी पोलीसात तक्रार दाखल केलीय..
त्यामध्ये राबीया खान यांनी म्हटलंय की, माझी मुलगी करिअरमुळे तणावात होती आणि त्यातूनच तिने आत्महत्या केली असा अंदाज मीडिया तसेच फिल्म इंडस्ट्रितून व्यक्त केला गेला होता.पण खरं तर हे सगळं काही सूरज आणि आदित्य पांचोलीमुळे घडलं आहे.त्यांनी जियाचा छळ केला होता.हे सगळं जियाने मला तसेच तिच्या बहिणीला सांगितलं होतं आणि त्यामुळेचं हे मला माहिती आहे.जियाने जे काही पत्रात लिहिलंय ते मी इथं नमुद करत आहे.जियाच्या मृत्यूनंतर तीन दिवसांनी तिची बहिण जियाने लिहिलेल्या कविता शोधत असतांना जियाच्या पर्समध्ये हे पत्र तिच्या हाती लागलं.त्यानंतर मी जियाचं हे पत्र सर्वांसमोर आणण्याचा निर्णय घेतला.त्यामुळे जियाच्या मृत्यूचं कारण सगळ्या दुनियेला कळेल.
खरं तर जियाच्या मृत्यूच्या पहिल्यादिवसापासून जियाच्या आईने सूरज पांचोलीला जियाच्या मृत्यूला जबाबदार धरलं होतं..पण त्यांच्या आरोपांना पुराव्याची जोड नव्हती..पण राबीया खान यांनी जियाचं शेवटचं पत्र तसेच तक्रार पोलीसात दाखल केली..आणि सोमवारी पोलिसानी सूरज पांचोली याला अटक केलीय.. जियाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा सूरजवर आरोप ठेवण्यात आलायं..
जियाने लिहिलेल्या त्या सहापानी चिठ्ठीत आपल्या आत्महत्येची सहा वेगवेगळी कारणं लिहिली आहेत.. असं कोणतं कारण होतं ज्यामुळे जियाची घुसमट होत होती.. करिअरमध्ये आलेल्या अपयशामुले तिने जीवनयात्रा संपवली की प्रेमातील अपयश त्यामागचं कारण आहे?
प्रेम...होकार.. विरह...अबोला..प्रेमभंग ...आणि मृत्यू ...ही कहाणी आहे रुपेरी दुनियेत आपलं स्थान निर्माण करण्यासाठी आलेल्या एका हिरोईनची...जिला आपल्या करिअरची सुरुवातीलाच यश मिळालं खरं मात्र शेवट मनाला चटका लावून गेला....पण या कहाणीचा अंत होण्यापूर्वी जियाने मनातील भावनांना आपल्या शेवटच्या पत्रातून वाट मोकळी करुन दिली होती...जियाने लिहिलेल्या या सहा पानी पत्राच्या प्रत्येक पानावर तिची वेदना जाणवते...जीवनाचा मनसोक्त आनंद घेण्याच्या वयात जियाने मृत्यूला कवटाळण्याचा निर्णय का घेतला हे तिचं पत्र वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल..
पहिल्या पानावर जिया लिहिते `गर्भवती होण्याची भीती असतांनाही मी माझं सर्वस्व तुझ्या हवाली केलं` पत्राच्या दुस-या पानावरच्या मजकुरातून जियाच्या आयुष्यातील अत्यंत धक्कादायक माहिती समोर आलीय `वेदना,शिवीगाळ,छळ आणि बलात्कार` ...जियाचे सूरजशी प्रेमसंबंध होते..सूरजने तिच्यावर बलात्कार करुनही तिने तो निमुटपणे सहन केला.
जियाने आपल्या शेवटच्या पत्रावरच्या तिस-या पानावर सूरज विश्वासघातकी असल्याचं म्हटलंय. जियाने त्याच्यावर विश्वास टाकला पण सूरजने मात्र तिचा विश्वासघात केला. जियाच्या पत्राच्या चौथ्या पानावर सूरजच्या करिअरचा उल्लेख आहे. `जियाने जे काही पैसे कमावले होते ते तिने सूरजच्या करिअरसाठी खर्च केले पण सूरजला त्याची परवा नव्हती`. पत्राच्या पाचव्या पानावर जियाने जे काही लिहिलंय ते हादरवून सोडणारं आहे. सूरजमुळेचं जियाला गर्भपात करावा लागला होता. जियाच्या पत्राच्या शेवटच्या पानावर तिने आपली सगळी वेदना मांडली आहे .जियाने सूरजवर मनापासून प्रेम केलं होत आणि सूरजनेही तिच्यावर तेव्हडचं प्रेम करावं असं जियाला वाटतं होतं.पण जियाला प्रेम मिळण्याऐवजी तिचा छळ झाला ..आणि त्यामुळेच कदाचित जियाने या जगाचा कायमचा निरोप घेतला.. आपल्या करिअरच्या सुरुवातीलाच यश गाठणा-या जियाची कहाणी सुरु होण्यापूर्वीच संपली...कसं होतं जियाचं आयुष्य त्यावर एक नजर...
जिया खान...वय २५ वर्षे.. तीन चित्रपट... जियाने केवळ तीन बॉलीवूडपटात काम केलं होतं..मात्र असं असतानाही बॉलीवूडच्या उदयोन्मुख अभिनेत्रींमध्ये जियाने स्थान मिळवलं होतं..बॉलीवूडमध्ये पाऊल टाकण्याआधी लोक तिला नफिसा खान या नावाने ओळखत होते..पण बॉलीवूडमध्ये एन्ट्री घेताच तिने नफीसा ऐवजी जिया हे नाव धारण केलं...