कमी कालावधीत जास्तीत जास्त आंब्यांची विक्री करण्यासाठी काही आंबा व्यापारी घातक केमिकलचा वापर आंबा पिकवण्यासाठी करतात...त्यामुळे आंबा खरेदी करणा-या ग्राहकांच आरोग्य धोक्यात आलाय...या पार्श्वभूमिवर नागपूरच्या अन्न वऔषध प्रशासन विभागाने छापा सत्र सुरु केलंय...
आंबा पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाईड सारख्या अत्यंत घातक केमिकलचा वापर करणा-या आंबा विक्रेत्यांवर नागपूरच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाने धडक कारवाई सुरु केलीय.
केमिकलमध्ये पिकवलेले आंबे वरवर पहायला अत्यंत आकर्षक असतात...त्यामुळे ग्राहक तो पिवळाधम्मक रंग पाहून आंबे खरेदी करातात..पण त्या आंब्यात दडलेल्या गोड विषाची त्याला जराही कल्पना नसते... मात्र आंबा व्यापा-यांना त्याची जराही चिंता नाही...
नागपूरच्या अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईत आंब्याचा साठा ताब्यात घेतला असून आंब्याचे नमुने तापसणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत...तो अहवाल आल्यानंतर सर्वकाही स्पष्ट होईल...मात्र तुम्ही आंबा खरेदी करणार असाल तर तो घातक केमिकलमध्ये पिकवला तर नाही ना याची खात्री करुन घ्या...
आंबा सर्वांनाच आवडतो...त्यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात आंब्याची विक्री होते..पण केमिकलमध्ये आंबा पिकवला जात असल्यामुळे नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला आंबा कसा ओळखायचा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल...
आंब्याची गोडी काही औरच .. त्यामुळे तो सर्वांनाच आवडतो....पण आता आंब्याला केमिकलनं ग्रासल्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय...खरं तर आंबा हा वाळलेल्या गवतात पिकवला जातो...नैर्गिकपणे आंबा पिकण्यासाठी १२ ते १५ दिवस लागतात...पण आंबा व्यापारी लवकर आंबा पिकावा म्हणून कॅल्शियम कार्बाईड सारख्या घातक केमिकलचा वापर करतात....पण त्यामुळे तो आंबा खाणा-याला गंभीर आजारांना सामोरं जावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही..
केवळ ठरावीक जातीचे आंबेच केमिकलमध्ये पिकवले जातात असं नाही तर हापूस पासून पायरी पर्यंत सगळ्याच आंब्यांना केमिलकचं ग्रहण लागलंय..विशेष म्हणजे ग्राहकांना याची जराही खबर लागू दिली जात नाही...पण काही बाबींवरुन केमिकलमध्ये पिकवलेला आंबा तुम्हाल ओळखता येईल...
केमिकलमध्ये पिकवलेल्या आंब्याचा रंग अत्यंत गडद असतो. कॅल्शियम कार्बाईडमुळे आंब्याचा रंग गडद पिवळा होतो... मात्र नैसर्गिकरित्या पिकवलेल्या आंब्याप्रमाणे त्याला गंध नसतो...केमिकलमध्ये पिकवलेल्या आंब्याला गोडी नसते...या काही गुणधर्मावरुन तुम्हाला केमिकलमध्ये पिकवलेला आंबा ओळखता येईल...