कल्पना मुंदडा, www.24taas.com, परभणी
मका लागवडीचं क्षेत्र दिवसेंदिवस वाढत असलं तरी सरासरी उत्पादन कमीच आहे. त्यामुळे शेतक-यांनी महत्वाच्या बाबी विचारात घेण्याच्या दृष्टिने महात्मा फुले कृषी विद्यापीठाताल प्रा. आनंद गोरे यांनी मार्गदर्शन केलंय.
मराठवाड्यात मक्याच्या लागवडीखालील क्षेत्र वाढलंय.राज्याच्या 33 टक्के एवढं क्षेत्र मराठवाड्यात आहे. शेतक-यांनी उत्पादनाची पराकाष्ट करत उच्चांकी उत्पादनासाठी सातत्याने प्रयत्न केलाय. मात्र उत्पादनवाढीसाठी अजूनही काही शास्त्रोक्त बाजू तपासून घेण्याची आवश्यकता असल्याच मत महात्मा फुले कृषी विद्यापीठातील प्रा. आनंद गोर यांनी व्यक्त केलंय़.
मक्याची लागवड करतांना शेतकऱ्यांनी दोन ओळीतील अंतर हे दीड फुटावर ठेवाव तसेच दोन झाडातील अंतर एक फुट ठेवावं. मजूरांअभावी पिकामध्ये तणनाशकाचा वापर करावा. एट्राझिन ह्या तणनाशकाचा वापर प्रभावी ठरत असल्याने कमी खर्चात तणांच नियंत्रण होत. प्रती हेक्टरी 120 किलो नत्राचा वापर करतांना अर्धे नत्र पेरणीच्या वेळेस तर अर्धे नत्र लागवडीनंतर एक महिन्यांनी देण आवश्यक आहे. सध्या मका पिकावर खोड किडा आणि नाकतोड्याचा प्रादुर्भाव झाला आहे. यासाठी 20 मिली क्विनॉलफॉस 10 लिटर पाण्यातून मिसळुन फवारावे तसेच फवारातांना औषध पोंग्यात जाईल याची काळजी घेण आवश्यक आहे
पावसाअभावी मक्याची लागवड रखडलीय. त्यामुळे उत्पादनातील घट भरुन काढण्यासाठी शेतक-यांनी या उपाय योजना हाती घेउन उत्पादन वाढीसाठी प्रयत्न कराय़ला हवा.