www.24taas.com
शिक्षक आणि विद्यार्थी ही गोष्ट काही वेगळीच असते... आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने आमच्या साऱ्या प्रेक्षकांना आणि मित्रांना ‘झी २४ तास’कडून शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा… तसेच आपण आपल्या शिक्षकांना खास भेट देऊ शकता ते आमच्या माध्यमातून... आपण आपल्या शिक्षकांना आमच्या वेबसाईटच्या माध्यमातून द्या शुभेच्छा... शिक्षकांना शुभेच्छा द्यायच्या असल्यास मांडा रोखठोक मत येथे आपल्या नावासकट द्या शिक्षक दिनाच्या शुभेच्छा…. आमच्या माध्यमातून आपल्या शुभेच्छा पोहचवा आपल्या शिक्षकांपर्यंत...
डॉ. राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन (५ सप्टेंबर) म्हणून साजरा केला जातो. शिक्षक हा सामाजाचा निर्माण कर्ता आहे. छोट्या बालकाचे देशाचा उत्कृष्ट नागरिक म्हणून परिवर्तन करण्याचे कार्य शिक्षकाला कारायचे असते. राष्ट्रउभारणीच्या कार्यात शिक्षकाचा मोठा वाटा असतो. डॉ. राधाकृष्णन यांनी एके ठिकाणी म्हटले आहे - "ज्या देशात निस्वार्थी निरपेक्ष व सेवावृत्तीने कोणतेही कार्य होते तेंव्हा त्या देशातील शिक्षकच खरे सन्मानाला पात्र होतात." आणि म्हणूनच त्यांच्या जन्मदिनी शिक्षकांचा सन्मान केला जातो.
शिक्षकाकडेच शिकविण्याविषयीची समर्पण भावना नसेल आणि शिक्षणाकडे तो एक मिशन या दृष्टीने पहात नसेल तर चांगल्या शिक्षणाची कल्पनाच करता येत नाही. त्यांनी अनेक वर्षे अध्यापन केले. आदर्श शिक्षकाचे सर्व गुण त्यांच्यात होते. त्यांच्या मते शिक्षक तोच व्हायला हवा जो सर्वांत बुद्धिमान आहे. त्याचप्रमाणे केवळ चांगले शिकवले म्हणजे संपले असे मानता कामा नये. त्याने विद्यार्थ्यांना स्नेह आणि आदर कसा निर्माण करायचा हेही शिकवायला पाहिजे. केवळ शिक्षक झाल्याने आदर मिळत नाही, तो मिळवावा