अपमान... २६/११ च्या शहीदाचा

२६/११ च्या हल्ल्यात मुंबई सीएसटी रेल्वे स्थानकावर अतिरेक्यांशी लढताना आरपीएफचे जवान मुरलीधर चौधरी शहिद झाले. चौधरी यांना मरणोत्तर शौर्य पदकही मिळालेलं नाही. पेट्रोलपंप मिळवण्यासाठी चौधरींच्या विधवा पत्नीला सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतायेत.

Updated: Nov 26, 2011, 07:41 AM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

२६/११ च्या हल्ल्यात मुंबई सीएसटी रेल्वे स्थानकावर अतिरेक्यांशी लढताना आरपीएफचे जवान मुरलीधर चौधरी शहिद झाले. चौधरी यांना मरणोत्तर शौर्य पदकही मिळालेलं नाही.  सरकारनं जाहीर केलेला पेट्रोलपंप मिळवण्यासाठी शहिद चौधरींच्या विधवा पत्नीला सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतायेत.

 

मुंबईवर झालेल्या २६/११च्या दहशतवादी हल्ल्यात आरपीएफचे जवान मुरलीधर चव्हाण यांनी दहशतवाद्यांशी दोन हात करताना आपल्या प्राणांची आहूती दिली. देशासाठी बलिदान केलेल्या या शूर जवानाच्या वाट्याला मात्र अजुनही उपेक्षाच आलीये. मुरलीधर चौधरी यांना मरणोत्तर शौर्य पदकही देण्यात आलेलं नाही. सरकारनं चौधरी कुटुंबिय़ांना पेट्रोलपंप देण्याचं दिलेलं आश्वासन अजूनही पूर्ण झालेलं नाही. चौधरी यांच्या पत्नी आजही पेट्रोलपंपासाठी सरकारी ऑफिसेसचे उंबरठे झिजवतायेत.

 

घरातला कर्ता पुरुष गेल्यानं अगोदरच खचलेल्या चौधरी कुटुंबियांचा जीव लालफितीच्या कारभारामुळं मेटाकुटीला आलाय. अशावेळी किमान सरकारनं शहिदांच्या कुटुंबियांना दिलेली आश्वासनं वेळेवर पाळावीत हीच माफक अपेक्षा आहे. एवढं केलं तरी ती शहिदांना श्रद्धांजली वाहिल्यासारखं होईल.

Tags: