विधान परिषदेचा आखाडा

राज्यातली प्रत्येक निवडणूक सध्या कुठल्याना कुठल्या कारणानी गाजतेय. विधानपरिषदेची निवडणूक तरी याला अपवाद ठरेल अस वाटत असताना सत्तेच्या भागीदाऱ्यांमधला सत्तासंघर्ष सा-या महाराष्ट्रानं पाहिला. राष्ट्रवादीचा वरचढपणा दिसत असला तरी, यामागे काँग्रेसचाही स्वार्थ दडलाय.

Updated: May 29, 2012, 11:49 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

राज्यातली प्रत्येक निवडणूक सध्या कुठल्याना कुठल्या कारणानी गाजतेय. विधानपरिषदेची निवडणूक तरी याला अपवाद ठरेल अस वाटत असताना सत्तेच्या भागीदाऱ्यांमधला सत्तासंघर्ष सा-या महाराष्ट्रानं पाहिला. राष्ट्रवादीचा वरचढपणा दिसत असला तरी, यामागे काँग्रेसचाही स्वार्थ दडलाय.

 

केंद्रात तसेच राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आहे. पण प्रत्येक निवडणुकीत एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी दोन्ही पक्ष कधीच सोडत नाहीत. विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा हा प्रकार समोर आलाय. या निवडणुकीत काँग्रेसला चंद्रपूर आणि अमरावतीची जागा गमवावी लागली. या दोन्ही जागा गेल्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. पक्षाला हे अपयश का आलं याच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. एकीकडं पक्ष पातळीवर आत्मचिंतन केलं जातय  तर दुसरीकडं  राष्ट्रवादी काँग्रेसशी  आघाडी केल्यामुळेच हा पराभव झाल्याचं काँग्रेसचे नेते सांगत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही काँग्रेसने  वेगवेगळी निवडणूक लढवली होती.त्यामुळे विधानपरिषदेतही स्वबळावर निवडणुक लढावी  अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना होती. मात्र आड आली ती राष्टपतीपदाची निवडणूक. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची मदत लागणार हे काँग्रेस श्रेष्ठींना ठाऊक असल्यामुळेच नाईलाजाने का होईना काँग्रेसने विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला.

 

आघाडीचा राष्ट्रवादीने पुरेपुर फायदा उचलला आणि त्यामुळेच कोकण, नाशिक आणि परभणी या तीनही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला जिंकता आल्या. मात्र दुसरीकडे काँग्रेसने लढविलेल्या तीन जागांपैकी दोन जागा त्यांना गमवाव्या लागल्या. दोन्ही काँग्रेसची मतं फुटल्यामुळे काँग्रेसला फटका बसला. परभणीसारखी सेफ जागा काँग्रेसने वाटाघाटीत राष्ट्रवादीला सोडली आणि त्या बदल्यात चंद्रपूरची जागा त्यांना मिळाली. या अदलाबदलीचा फायदाही राष्ट्रवादीलाच झाला. आता काँग्रेसच्या स्तरावर काय चुका झाल्या याचं गणितं मांडलं जातंय.

 

या निवडणुकीत नेहमीप्रमाणे राष्ट्रवादीने दगाफटका केल्याची तक्रार काँग्रेस कार्यकर्त्यांकडून केली जातेय. तर आपण समन्वयाने काम केल्याचा दावा राष्ट्रवादीकडून केला जातोय. नुकत्याच पार पडलेल्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संबंध अगदी ताणले गेले होते.आता विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीने काँग्रेसला कात्रजचा घाट दाखविल्यामुळे संबंध आणखीच बिघडण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत... मात्र राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमुळे राष्ट्रवादीची दादागिरी काँग्रेसला निमुटपणे सहन करण्यावाचून पर्याय नसल्याचं राजकीय जाणकारांना वाटतंय. आज काँग्रेस - राष्ट्रवादीची आघाडी म्हणजे तुझंमाझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना अशी झाली आहे. पण राष्ट्रपतीपदाची निवडणूक पार पडल्यानंतर तरी काँग्रेसकडून राष्ट्रवादीबाबत कठोर भूमिका स्वीकारली जाते का ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

विधान परिषदेची जागा म्हणजेचा कर्तृत्वाचा गौरव हे समीकरण आता काळाच्या ओघात पुरतं बदलून गेलंय. पक्षाच्या जागा वाढवा या एककलमी कार्यक्रमातंर्गत या निवडणुका आल्या आणि सुरु झाला सत्तासंघर्ष.. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायानं बदलत चाललेल्या नाशिकच्या राजकारणाचे रंग मात्र दिवसागणिक बदलत चालले आहेत.

 

नाशिकमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीत नशिबाने साथ दिली म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांचे कट्ट समर्थक  जयंत जाधव यांचा विजय झाला. या निवडणुकीत नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळांची राजकीय प्रतिष्ठापणाला लागली  होती. आपला उमेदवार सहज विजयी होईल असा त्यांना विश्वास होता. पण प्रत्येक्ष  निवडणूकीत  वेगळीच परिस्थिती निर्माण झाली होती. 225 मतं मिळविण्यासाठी भुजबळांची चांगलीच दमछाक झाली. कारण या निवडणुकीत काँग्रेस आघाडीची एक- दोन नव्हे तर तब्बल 54 मतं फुटली. त्यामुळे भुजबळांना मोठा धक्का बसला. कारण भुजबळांच्या दृष्टीने सहज विजयी होणा-या  उमेदवाराला ईश्वर चिठ्ठीत नशिब आजमावण्याची पाळी आली होती. खरं तर भुजबळ म्हणतील ती पुर्व असं चित्र गेल्या काही वर्षात नाशिकमध्ये पहायला मिळत