विंदू ‘डी कंपनी’शी संबंधित?

विंदूचे या बुकींशी खूप घनिष्ठ संबंध होते. याचमुळे विंदूचे दाऊदचा भाऊ अनिस इब्राहिमशी ही संबंध होते का? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 23, 2013, 10:34 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सट्टा लावल्याप्रकरणी विंदू सिंग याच्या अटकेनंतर नव नवीन खुलासे होत आहेत. विंदूने संजय जयपूर आणि पवन जयपूर यांना दुबईला पळून जाण्यास मदत केली. मुंबईत हॉटेलमध्ये राहण्यापासून ते दुबईला जाण्यापर्यंत या दोघांची विंदूनं खातीरदारी केली होता. कारण विंदूचे या बुकींशी खूप घनिष्ठ संबंध होते. याचमुळे विंदूचे दाऊदचा भाऊ अनिस इब्राहिमशी ही संबंध होते का? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.
पोलिसांनी विंदूची चौकशी केली. त्याच्याकडून पोलीसांनी संजय जयपूर आणि पवन जयपूर यांचे तीन मोबईल फोन, एक लपटॉप आणि एक आयपॅड हस्तगत केलाय. त्याच्या तपासणीतून आतापर्यंत विंदूनं सट्ट्याच्या माध्यामातून कोट्यावधी रुपये कमावल्याचं उघड झालंय.

विंदूनं या बुकींमार्फत आयपीएल सहा मध्ये आतापर्यंत तब्बल १७ लाखांचा फायदा मिळवल्याचं उघड झालंय. फक्त विंदूलाच नाही तर त्याच्या बॉलिवूडमधील मित्रांनाही त्यानं बेटींगच्या माध्यामातून फायदा करुन दिलाय. नुकताच एका मुद्द्यावरुन चर्चेत असलेला एक सुपरस्टार आणि सतत वादात असलेल्या एका सुपरस्टारचा भाऊ यांची नावं या प्रकरणात असल्याचं बोललं जातंय.

विंदू बुकींबरोबरच या सुपरस्टारशी संपर्कात होता. एवढंच नाहीतर या विंदूचे बीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवासन यांचा जावई गुरूनाथ मय्यपनशीही संबंध होते. पोलीस लवकरचं आता गुरुनाथ मय्यपनची चौकशी करणार आहेत. त्यामुळे आता या प्रकणात आणखी कोणाची नावं उघड होतात, याची उत्सुकता सर्वांना लागलीय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.