बाप्पाचे स्वागत `खड्डेमय रस्त्यांनी`

कोकणात गणेशोत्सवाची धूम असते. मुंबई, पुण्यासह इतर भागात काम करणारे चाकरमानी गणेशोत्सवासाठी आवर्जुन घराकडे परतत असतो. मात्र दरवर्षी प्रमाणे यंदाही खड्डेमय रस्त्यांचा अडथळा पार करुनच कोकणवासीयांना बाप्पाच्या स्वागतासाठी जावं लागणार आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 17, 2012, 09:45 AM IST

www.24taas.com,अलिबाग
कोकणात गणेशोत्सवाची धूम असते. मुंबई, पुण्यासह इतर भागात काम करणारे चाकरमानी गणेशोत्सवासाठी आवर्जुन घराकडे परतत असतो. मात्र दरवर्षी प्रमाणे यंदाही खड्डेमय रस्त्यांचा अडथळा पार करुनच कोकणवासीयांना बाप्पाच्या स्वागतासाठी जावं लागणार आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर काही ठिकाणी चौपदरीकरणाचे काम सुरु असल्याने यंदाचा प्रवास आणखी खडतर होणार आहे. आधीच खड्ड्यांमुळं वैतागलेले वाहनचालक आणि प्रवासी आपला संताप व्यक्त करतात. महामार्ग क्र. १७वरील खड्ड्यांची ही डोकेदुखी दरवर्षीची. राजकीय पक्षही याप्रश्नी आवाज उठवतात. पण स्थितीत काहीच फरक पडत नाही.
महामार्गाच्या अवस्थेबाबत प्रशासनाला जाणीव आहे. मात्र कार्यवाही शुन्य आहे. १५सप्टेंबरपर्यंत खड्डे बुजवले जातील असे आदेश होते. मात्र आता बाप्पांचं आगमन दोन दिवसांवर येवून ठेपलं तरी परिस्थिती जैसे थे आहे. रायगडचे जिल्हाधिकारी मात्र पर्यायी रस्ते सुस्थितीत असल्याचा दावा करताये.
दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणचा प्रवास प्रवाशांच्या नाकीनऊ येणार असंच चित्र आहे. तरीही बाप्पांच्या ओढीनं घराची आस लागलेल्या कोकणवासीयांचा उत्साह तसूभरही कमी होणार नाही, हे मात्र नक्की.