www.24taas.com, पुणे
पुण्यातल्या गणेश मंडळांना एका अर्थी गणपती आल्य़ा आल्या पावलाय. कारण गेल्या वर्षी मंडळांवर दाखल करण्यात आलेले खटले मागे घेण्याचे आदेश अखेर गृह मंत्रालयाने दिले आहेत.
मंगळवारी रात्री उशीरा हे आदेश जारी करण्यात आले. पुण्यातल्या १५५ मंडळांवर गेल्या वर्षी विसर्जन मिरवणुकीदरम्यान विविध कारणांसाठी गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे गुन्हे मागे घेण्याची मागणी शहरातल्या आमदारांनी लावून धरली होती. काही गंभीर स्वरूपाचे गुन्हे वगळता सर्व खटले या आदेशान्वये मागे घेण्यात आलेत.
त्याशिवाय गणेशोत्सव काळात शेवटचे ५ दिवस रात्री १२ पर्यंत लाऊडस्पीकर वाजवण्याला परवानगी आहे. गणेशोत्सव संदर्भातल्या दोन महत्वाच्या विषयांवर सकारात्मक निर्णय झाल्याने गणेशोत्सवाचा पहिलाच दिवस कार्यकर्त्यांसाठी डबल धमाका ठरलाय.