पुण्यातले मानाचे गणपती

पुण्यनगरीमध्ये गणेशोत्सवाची धामधूम सुरू झालीये. सामान्य नागरिकांनी बाप्पाला घरी आणण्यासाठी आजपासूनच गर्दी केलीये. तर मंडळाचे कार्यकर्ते मिरवणुकीच्या तयारीत मग्न आहेत

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 9, 2013, 12:04 AM IST

www.24taas, झी मीडिया, पुणे
पुण्यनगरीमध्ये गणेशोत्सवाची धामधूम सुरू झालीये. सामान्य नागरिकांनी बाप्पाला घरी आणण्यासाठी आजपासूनच गर्दी केलीये. तर मंडळाचे कार्यकर्ते मिरवणुकीच्या तयारीत मग्न आहेत. पुण्यातील गणेशोत्सवाचे खास आकर्षण असलेल्या मानाच्या गणपतीच्या मिरवणुकीची तयारीही पूर्ण झालीये.
सर्वांच्याच लाडक्या गणरायाच्या आगमनाला अवघे काही तासच उरले आहेत. आणि ज्या शहरातील गणेशोत्सवाकडे पूर्ण महाराष्ट्रच नाही तर पूर्ण देशभराच लक्ष लागून राहिलेलं आहे अशा पुण्यनगरीमध्ये गणपतीच्या स्वागताची तयारी पूर्ण झालीये. मानाच्या पाचही गणपतींची सोमवारी दिमाखात मिरवणूक निघेल. आणि प्राणप्रतिष्ठा केली जाईल.
मनाचा पहिला कसबा गणपती
मिरवणुकीची सुरवात सकाळी 9 वाजता
प्रभात बॅंड आणि नगारा पथकाचा सहभाग
चांदीच्या पालखीतून श्रींची मूर्ती मंडपात आणली जाईल
11 वाजून 16 मिनिटांनी प्राणप्रतिष्ठा
मंडळाने यावर्षी पेशवेकालीन गणेश मंदिराची प्रतिकृती उभारली आहे.
मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी
गणपतीची स्थापना चांदीच्या मखरात
सकाळी 9 वाजता केळकर रस्त्यावरून मिरवणुकीला प्रारंभ
नगारा, ढोल, लेझीम, बॅंड पथकांचा समावेश
अप्पा बळवंत चौकातील मंडपात 12 वाजून 30 मिनिटांनी स्थापना
मनाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम
फुलांच्या रथातून बाप्पाची मिरवणूक
सकाळी 9 वाजता मिरकणूकीस प्रारंभ
नगारा पथकांसह शिवगर्जना, नादब्रम्हची ढोल-ताशा पथकांचा सहभाग
11 वाजून 55 मिनिटांनी प्राणप्रतिस्थापना
मोरपिसांचा देखावा केलेल्या क्रिस्टल पॅलेसचे आकर्षण
मानाचा चौथा तुळशीबाग गणपती
दशावतार मंदीरातील विष्णु आणि गजेंद्रमोक्ष शिल्पाची प्रतिकृती
सकाळी 8.30 वाजता मंडई जवळून मिरवणुकीला प्रारंभ
जगलक्ष्मी ढोल-ताशा पथकांचा मिरवणुकीमध्ये सहभाग
सकाळी 11 वा. तुळशी बागेतील मंडपात श्रींची स्थापना
मानाचा पाचवा ..केसरी वाडा गणपति
लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेला गणपती
मिरवणूक सकाळी 9 वाजता निघेल
ढोल-ताशा पथकांचा सहभाग
केसरी वाड्यातील मंडपात 10 वाजता मूर्तिची स्थापना
श्रीमंत दगडू शेठ हलवाई गणपती
गणेश मंदिरापासून फुलांच्या रथातून सकाळी आठ वाजता मिरवणूक
नगारा, ढोल, ताशे आणि बॅंड पथकांचा सहभाग
सकाळी साडेनऊ वाजता चामुंडेश्वरी मंदिरामध्ये गणपतीची स्थापना
देशातील विविध कलाकृतींचे नमुने देखाव्यातून सादर करण्याची दगडूशेठ मंडळाची खासियतच आहे......यावर्षी या मंडळाने चामुंडेश्वरी मदिराची तब्बल 125 फुट उंचीची प्रतिकृती उभारलीये. गणपतीची स्थापना केलं जाणार मखरही दक्षिणात्य पद्धतीने तयार करण्यात आलय.......याशिवाय जमीनिवरही वैशिष्ट्यपूर्ण अशा टाइल्स लावण्यात आल्या आहेत. ज्या बाप्पाच्या आगमनाची पुणेकर वर्षभर वाट पाहत असतात. पुढचे 10 दिवस पुण्यात भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.