सोलापूर, माढा मतदार संघात `अजब गोंधळ`

माढाचे महायुतीचे उमेदवार सदाभाऊ खोत यांच्या वादग्रस्त वक्तव्याची ऑडीओ क्लिप आर आर पाटील यांनी सांगलीत पत्रकारांना ऐकवली. तर सोलापूर लोकसभा मतदार संघातील मोहोळ विधानसभा निवडणूक अधिका-यांनं निवडणूकीच्या प्रशिक्षण शिबिरात दारु पीऊन गोंधळ घातला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 16, 2014, 09:23 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, सोलापूर
माढाचे महायुतीचे उमेदवार सदाभाऊ खोत यांच्या वादग्रस्त वक्तव्याची ऑडीओ क्लिप आर आर पाटील यांनी सांगलीत पत्रकारांना ऐकवली. तर सोलापूर लोकसभा मतदार संघातील मोहोळ विधानसभा निवडणूक अधिका-यांनं निवडणूकीच्या प्रशिक्षण शिबिरात दारु पीऊन गोंधळ घातला.
सदाभाऊ खोत यांनी सेना भाजपवर टीका केल्याचा सूर या क्लिपमध्ये ऐकायला मिळतो. त्यांनी त्यांच्या मतदारसंघात ५० -५० कोटी वाटल्याचा दावा क्लीपमध्ये केलाय. काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेलो असतो तर विधान परिषद तरी मिळाली असती असा दावाही त्यांनी केलाय.
सोलापूर लोकसभा मतदार संघातील मोहोळ विधानसभा निवडणूक अधिका-यांनं निवडणूकीच्या प्रशिक्षण शिबिरात दारु पीऊन गोंधळ घातला. यावेळी या अधिका-यानं निवडणूक केंद्रप्रमूख तथा शासकीय शाळेच्या मुख्याध्यापकाला मारहाणही केली.
अधिका-यांच्या या मुजोरी विरोधात सर्व कर्मचा-यांनी आंदोन करत निवडणूकींच्या कामावर बहिश्कार घातला. शिक्षकांचा उद्रेक पाहता अप्पर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी या केंद्राला भेट दिली आणि शिक्षकांची समजूत काढून कारवाईचं आश्वासन दिलं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.