मतदार यादी घोळ : बिग बी नाराज, षडयंत्राचा आरोप

मतदार यादीमधल्या घोळामुळे मुंबईतल्या हजारो नागरिकांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावं लागलंय. त्यामुळेच आता यासंदर्भात शिवसेना, मनसे आणि भाजप निवडणूक आयोगाकडे दाद मागणार आहेत. मतदार यादीमध्ये नावांचा घोळाच्या पाठिमागे काँग्रेस राष्ट्रवादीचंचं षडयंत्र असल्याचा आरोपही हे पक्ष करतायत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 25, 2014, 01:35 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मतदार यादीमधल्या घोळामुळे मुंबईतल्या हजारो नागरिकांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावं लागलंय. त्यामुळेच आता यासंदर्भात शिवसेना, मनसे आणि भाजप निवडणूक आयोगाकडे दाद मागणार आहेत. मतदार यादीमध्ये नावांचा घोळाच्या पाठिमागे काँग्रेस राष्ट्रवादीचंचं षडयंत्र असल्याचा आरोपही हे पक्ष करतायत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मतदारांची नावं गायब करणा-या झारीतल्या शुक्राचार्यांचा बंदोबस्त करावा लागेल, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलंय. मतदारांना मतदानापासून वंचित ठेवणं, हा गुन्हा आहे, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.
मतदार याद्यांमध्ये अनेकांची नावं न आल्यामुळे बिग बी अमिताभ बच्चन वैतागलेत आहेत. त्यांनीही नाराजी व्यक्त केली. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट केलंय. मतदार यादीतील घोळ चांगला नव्हे! आजच्या पेपरमध्ये केवळ मतदार यादीतील घोळाच्याच बातम्याच आहेत. मतदारांची नावं गायब झालीच कशी ? हे कसं काय घडू शकतं?
दरम्यान, मतदार यादीतल्या घोळाचा फटका ठाण्यातल्या वर्तक नगर प्रभाग १७ चे कॉंग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांना देखील बसलाय. एखाद्या नगरसेवकाच मतदार यादीत नाव गायब ही किती हास्यास्पद बाब असून निवडणूक आयोग प्रशासनाविरुध्द मुंबई हायकोर्टात दाद मागणार असल्याच चव्हाण यांनी सांगितलं.
पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि मुंबई या शहरातील नागरिकांची मोठ्याप्रमाणात नावे गायब झाली आहेत. पुणे येथे मतदारांनी निवडणूक अधिकाऱ्यांना जाब विचारला तर जिल्हाधिकारी कार्यालयात ठाण मांडले. राज्यातील जवळपास दोन लाखांपेक्षा जास्त नावे गायब झाल्याचे पुढे आले आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.